IPL 2025 GT vs RR Yashasvi Jaiswal Catch of Rashid Khan: इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील २३ वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरातच्या संघानं राजस्थानच्या संघाला ५८ धावांनी पराभूत केले. गुजरातच्या संघानं दिलेल्या २१८ धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ १५८ धावांत आटोपला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राशीदचा नो लूक शॉट अन् यशस्वीचा जबरदस्त कॅच
राजस्थानविरुद्धच्या सामन्यातून राशीद खान पुन्हा ट्रॅकवर आल्याचे पाहायला मिळाले. संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान देताना त्याने २ विकेट्स घेतल्या. त्याआधी त्याने बॅटिंगमध्ये कमाल दाखवली. ४ चेंडूत एका चौकारासह एका षटकारासह त्याने १२ धावांची छोटीखानी खेळी केली. त्याची ही खेळी नो लूक शॉटनंतर घेतलेल्या सर्वोत्तम झेलमुळे संपुष्टात आली. यशस्वी जैस्वालनं त्याचा अप्रतिम झेल टिपल्याचे पाहायला मिळाले.
IPL Record: साईच्या भात्यातून 'फिफ्टी'चा विक्रमी 'पंच'; पठ्ठ्या थेट एबीच्या पंक्तीत जाऊन बसला
यशस्वी जैस्वालचा सुपरमॅन अवतार
राजस्थान विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीतील धमक दाखवण्या आधी राशीद खानने आपल्या फटकेबाजीचा नजराणा दाखवून दिला. मैदानात बॅटिंगला उतरल्या उतरल्या त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. चौथ्या चेंडूवर त्याने मारलेला नो लूक शॉटही मस्तच होता. पण यशस्वीच्या सुपरमॅन तोऱ्यातील कॅचसमोर तो फिका ठरला.
राशीदनं षटकारानं उघडले खाते, न बघता स्टायलिश अंदाजावर मारलेल्या फटक्यावर फसला
गुजरातच्या डावातील १९ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर तुषार देशपांडे याने साई सुदर्शनची विकेट घेतल्यावर राशीद खान मैदानात आला. त्याने षटकार मारत आपल्या इनिंगला सुरुवात केली. या षटकातील चौथ्या चेंडूवर राशीदच्या भात्यातून एक खणखणीत चौकार आला. पाचव्या चेंडूवर दोन धावाघेतल्यावर अखेरच्या अखेरच्या चेंडूवर राशीदनं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं नो लूक शॉट मारला. डावखुऱ्या जैस्वालनं उजव्या बाजूला उडी मारत त्याचा झेल टिपला. सोशल मिडियावर त्याचा हा झेल चांगलाच चर्चेत आहे.
Web Title: PL 2025 GT vs RR 23rd Match Rashid Khans No Look Shot But Yashasvi Jaiswal Grabs A Stunning Catch Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.