आयपीएल पाहण्याचा प्लॅन करत असाल तर करोडो क्रिकेट प्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे. वर्ल्डकप प्रेक्षकांविना सुका सुका गेला, परंतू अनेकजण मित्र मैत्रिणी, कुटुंबासह आयपीएल पाहण्यासाठी आतुरलेले आहेत. यंदाच्या आयपीएलचे पहिल्या १५ दिवसांचेच शेड्यूल जारी केले जाणार आहे. उर्वरित सामन्यांचे काय होणार, हा अद्याप प्रश्नच आहे.
आय़पीएल २०२४ ची सुरुवात २२ मार्चपासून होणार आहे. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी मंगळवारी याची माहिती वृत्तसंस्था पीटीआयला दिली आहे. लोकसभा निवडणूक असली तरी यंदा भारताबाहेर टुर्नामेंट खेळविली जाणार नसल्याचे धुमाळ यांचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणूक एप्रिल, मेमध्ये घेतली जाणार आहे. याच काळात आयपीएल देखील असणार आहे. यापूर्वी देखील आयपीएल सामने आणि लोकसभा निवडणूक एकाच वेळी आली होती. तेव्हा काही सामने परदेशात ठेवण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीमुळेच अद्याप आयपीएल २०२४ चे टाईमटेबल जारी करण्यात आलेले नाहीय.
धुमाळ यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला १५ दिवसांचे शेड्यूल जाहीर केले जाईल. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक हे लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली की जाहीर केले जाणार आहे. यासाठी आयपीएलचे पदाधिकारी आणि सरकारी यंत्रणा एकत्र काम करत आहेत. संपूर्ण आयपीएल भारतातच खेळविली जाणार आहे.
२००९ मध्ये आयपीएलचे संपूर्ण सामने हे दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळविण्यात आले होते. तर २०१४ मध्ये निवडणुकीमुळे काही सामने युएईमध्ये खेळविण्यात आले होते. २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक असताना भारतातच सामने खेळविण्यात आले होते.
Web Title: Planning for IPL 2024? The schedule will be released for the first 15 days only; Next matches will declaire after loksabha schedule
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.