Join us  

खेळण्यायोग्य परिस्थितीत ‘प्रदूषणाचा’ समावेश, ‘आयसीसी’चा विचार

खेळण्यायोग्य परिस्थितीच्या (प्लेर्इंग कंडिशन्स) नियमात हवेतील प्रदूषणाचा समावेश करण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा विचार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 3:45 AM

Open in App

नवी दिल्ली :  खेळण्यायोग्य परिस्थितीच्या (प्लेर्इंग कंडिशन्स) नियमात हवेतील प्रदूषणाचा समावेश करण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा विचार आहे. भारत- लंका यांच्यात येथे संपलेल्या तिसºया कसोटीदरम्यान प्रदूषणाचा मुद्दा गाजला होता. यामुळेच प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला आहे.भारताच्या फलंदाजीदरम्यान लंकेच्या खेळाडूंनी मास्क घालून क्षेत्ररक्षण केले. अनेक खेळाडू श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार करीत होते. वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल आणि लाहिरु तिरिमाने यांना मैदानावर उलट्याही झाल्या. आयसीसीने प्रदूषणाचा विषय वैद्यकीय समितीकडे पाठविण्याचा निर्णय घेतला. समिती सामन्याचा अहवाल आणि सामन्यादरम्यान दिल्लीत असलेला प्रदूषणाचा स्तर यावर सविस्तर अभ्यास करणार आहे.आयसीसीच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार,‘ दिल्ली कसोटी ज्या परिस्थितीत पार पडली त्याची दखल आयसीसीने घेतली आहे. यावर वैद्यकीय समितीने निर्देश द्यावेत,असे ठरले. वैद्यकीय समितीच्या निर्देशानुसार भविष्यात पुन्हा अशी स्थिती उद्भवल्यास तोडगा शोधला जाईल. याच मुद्यावर फेब्रुवारीत होणाºया आयसीसी बैठकीत पुन्हा चर्चा केली जाईल.’याशिवाय खेळण्यायोग्य परिस्थितीशी(प्लेर्इंग कंडिशन्स) संबंधित नियमांतही किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे. वायू प्रदूषणामुळे खेळाडूंच्या आरोग्याचे नुकसान झाल्यास काय उपाययोजना असावी,याबाबत नियम केला जाणार आहे.बीसीसीआयच्या एका अधिकाºयाने स्वत:चे नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, आयसीसीच्या ‘प्लेर्इंग कंडिशन्स’ नियमांत हवामानाशी संबंधित उपनियम आहे. कसोटी क्रिकेटच्या १४० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा वायू प्रदूषणामुळे २६ मिनिटे खेळ थांबविण्यात आला होता. ही परिस्थिती अपवादात्मक अशीच होती.इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष के. के. अग्रवाल यांनी बीसीसीआयला पत्र लिहून वायू प्रदूषणाशी संबंधित नियमाचा समावेश करण्याची मागणी आधीच केली होती. डॉ. अग्रवाल यांनी प्रदूषणाचा स्तर किती गंभीर आहे याकडे लक्ष वेधताना सामना न थांबविणे म्हणजे खेळाडूंच्या जीविताशी खेळण्याचा गंभीर खेळ होईल,असे पत्रात म्हटले होते.वायू प्रदूषणामुळे खेळाडूंच्या आरोग्याचे नुकसान झाल्यास काय उपाययोजना असावी,याबाबत नियम केला जाणार आहे.आयसीसीच्या ‘प्लेर्इंग कंडिशन्स’ नियमांत हवामानाशी संबंधित उपनियम आहे. कसोटी क्रिकेटच्या १४० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा वायू प्रदूषणामुळे २६ मिनिटे खेळ थांबविण्यात आला होता.ही परिस्थिती अपवादात्मक अशीच होती.

टॅग्स :क्रिकेटआयसीसी