Sourav Ganguly vs Virat Kohli : विराट कोहलीने मागितली विश्रांती; सौरव गांगुली म्हणाला, सलग १३ वर्ष खेळलो, कधी विश्रांती घेतली नाही ना ब्रेक!

Sourav Ganguly vs Virat Kohli : वर्कलोडमुळे आता एक मालिका खेळल्यानंतर अनेक सीनियर खेळाडू विश्रांती मागत असल्याची तक्रार बीसीसीआयने केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 01:13 PM2022-07-08T13:13:03+5:302022-07-08T13:13:24+5:30

whatsapp join usJoin us
'Played 13 years without break. Didn't take rest like a lot of players do now': BCCI President Sourav Ganguly   | Sourav Ganguly vs Virat Kohli : विराट कोहलीने मागितली विश्रांती; सौरव गांगुली म्हणाला, सलग १३ वर्ष खेळलो, कधी विश्रांती घेतली नाही ना ब्रेक!

Sourav Ganguly vs Virat Kohli : विराट कोहलीने मागितली विश्रांती; सौरव गांगुली म्हणाला, सलग १३ वर्ष खेळलो, कधी विश्रांती घेतली नाही ना ब्रेक!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sourav Ganguly vs Virat Kohli : वर्कलोडमुळे आता एक मालिका खेळल्यानंतर अनेक सीनियर खेळाडू विश्रांती मागत असल्याची तक्रार बीसीसीआयने केली आहे. त्यात  आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत विश्रांती हवी असल्याचा अर्ज  विराट कोहलीने ( Virat Kohli) केल्याची चर्चा आहे. त्यात बीसीसीआय अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याने महत्त्वाचं विधान केलं आहे. गांगुली हा भारताचा सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे आणि यात काहीच शंका नाही. भारतीय क्रिकेट जेव्हा मॅच फिक्सिंगच्या आरोपांनी ढवळून निघालं होतं, तेव्हा गांगुलीने कर्णधारपद स्वीकारलं अन् नेतृत्वक्षमतेनं भारतीय क्रिकेटचा चेहराच बदलला. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने २००१मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-१  असा कसोटी विजय मिळवला, इंग्लंडला २००२मध्ये नेटवेस्ट सीरिजमध्ये पराभूत केले आणि २००३च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले. 

२००५ मध्ये गांगुलीच्या कारकिर्दीला उतरती कळा आली आणि त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले. तो आयुष्यातील सर्वात खडतर काळ असल्याचे गांगुलीने मान्य केले. तो म्हणाला, ''त्यावेळी स्थानिक क्रिकेट खेळणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक नव्हते, परंतु जी परिस्थिती होती ती टफ होती. माझे त्यावर नियंत्रण नव्हते. मी भारतासाठी सलग १३ वर्ष विश्रांती न घेता खेळलो. मी एकही मालिका किंवा दौरा मिस केला नाही. आता अनेक खेळाडू विश्रांती घेतात, पण मी माझ्या कारकिर्दीत कधीच घेतली नाही. त्यामुळे माझ्या १७ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत सलग १३ वर्षांनंतर संघाबाहेर होते तो ४-६ महिन्यांचा काळ मी ब्रेक असा मानतो.'' 
 
एक मालिका झाली नाही की, ही लोकं विश्रांती मागतात!
 

एक मालिका खेळले नाही की हे सीनियर खेळाडू विश्रांतीची मागणी करत असल्याचा आरोप बीसीसीआयच्या सूत्रांनी TOI ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. ''निवड समितीच्या प्रत्येक बैठकीत वर्कलोड व्यवस्थापनाचा मुद्दा उपस्थित होतो. रोहित, कोहली, पांड्या, बुमराह आणि शमी हे खेळाडू नेहमीच विश्रांतीची गरज असल्याचे सांगतात. या खेळाडूंना विश्रांती मिळावी यासाठी नेहमीच प्राधान्यही दिलं जातं. ट्रेनर आणि फिजिओ संघ व्यवस्थापनाच्या हाती या खेळाडूंना विश्रांतीची गरज असल्याचे नोट पाठवतात,''असे सूत्रांनी सांगितले.  
 

Web Title: 'Played 13 years without break. Didn't take rest like a lot of players do now': BCCI President Sourav Ganguly  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.