नवी दिल्ली - भारताच्या १९ वर्षाखालील संघाने पाकिस्तानचा पराभव करीत अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला. सांघिक खेळाच्या जोरावर पृथ्वी शॉच्या टीमने एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली.द्रविडच्या मार्गदर्शनाचा हा परिणाम असल्याचे दिसून आले. द्रविड वेळोवेळी या तरुण खेळाडूंना मोलाचे सल्ले देत आला आहे. आयपीएल लिलावाकडे लक्ष न देता विश्वचषक स्पर्धेवर लक्ष देण्याचा सल्ला त्याने खेळाडूंना दिला. केवळ खेळावर या मुलांचे लक्ष केंद्रित राहावे म्हणून द्रविडने आणखी एक निर्बंध लावला. एकाग्र चित्ताने केवळ खेळातील बारकाव्यांवर लक्ष देऊन खेळात सुधारणा करता यावी या उद्देशाने द्रविडने खेळाडूंना मोबाईल बंद ठेवण्याचा आदेशच दिला. विश्वचषकाचा अंतिम सामना होईपर्यंत कोणताही खेळाडू मोबाईल वापरणार नाही, असा नियम बनविला आहे.शिवम मावी या खेळाडूचे वडील पंकज मावी यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये ही बाब समोर आली. अंतिम सामना होईपर्यंत राहुल सरांनी आमच्या मोबाईल वापरावर बंदी घालती आहे, अशी माहिती शिवमने आपल्या बाबांना बोलताना दिली. आम्ही शिवमशी रविवारी बोललो. मात्र त्यावेळी त्याने आता आपण फायनल नंतर बोलू असे सांगितले.विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम आणि उपांत्य फेरीच्या सामन्यांआधी प्रशिक्षक राहुल द्रविडने सर्व खेळाडूंना मोबाईल वापरू नये असे सांगितले असल्याचे पंकज मावी म्हणाले. कुटुंबातील सदस्यांचे आणि प्रसारमाध्यमांच्या सततच्या फोनमुळे खेळाडूंचे खेळावर लक्ष राहणार नाही, अशी भीती असल्याने द्रविडने ही बंदी आणल्याची माहिती शिवमने आपल्या वडिलांना फोनवरून दिली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- अंतिम सामना संपेपर्यंत खेळाडूंसाठी मोबाईल बंदी, प्रशिक्षक द्रविडचा निर्णय
अंतिम सामना संपेपर्यंत खेळाडूंसाठी मोबाईल बंदी, प्रशिक्षक द्रविडचा निर्णय
भारताच्या १९ वर्षाखालील संघाने पाकिस्तानचा पराभव करीत अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला. सांघिक खेळाच्या जोरावर पृथ्वी शॉच्या टीमने एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 2:08 AM