स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळलेल्या एका खेळाडूला कडक शासन करण्यात आले आहे. यापुढे कोणताही खेळाडू स्पॉट फिक्सिंगकडे वळू नये, यासाठी हे कडक पाऊल उचलण्यात आले आहे. स्पॉट फिक्सिंग करणाऱ्या खेळाडूला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
एका सामन्यात स्पॉट फिक्सिंगमध्ये हा खेळाडू दोषी आढळला होता. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली आणि हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयामध्येही या खेळाडूने स्पॉट फिक्सिंग केल्याचे निष्पन्न झाले. या खेळाडूला न्यायालयाने पंधरा वर्षांच्या कारावासाची शिक्ष ठोठावली होती. पण या खेळाडूने या निर्णयाविरोधात दया दाखवण्याची याचिका केली. त्यानंतर न्यायालयाने या खेळाडूला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली.
ही घटना घडीला आहे ती दक्षिण आफ्रिकेमध्ये. एका स्थानिक सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गुलाम बोदी या खेळाडूने स्पॉट फिक्संग केले होते. त्यामुळे आता त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.