Join us  

संघाने सामना जिंकूनही 'या' खेळाडूला भरावा लागला दंड

विजयाच्या आनंदावर काही प्रमाणात विरजण पडल्याचे दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 6:08 PM

Open in App

मुंबई : सामना जिंकूनही संघातील एका गोलंदाजाला दंड भरावा लागला आहे. त्यामुळे विजयाच्या आनंदावर काही प्रमाणात विरजण पडल्याचे दिसत आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही विराट कोहलीच्या टीमनं बाजी मारली. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं 133 धावांचं माफक लक्ष्य सहज पार केले. टीम इंडियानं दुसरा सामना 7 विकेट्स राखून जिंकताना मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र दुसरा ट्वेंटी- 20 सामना संपल्यानंतर न्यूझीलंड संघाचा सलामी फलंदाज मार्टिन गुप्तीलने भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला थेट कॅमेरासमोरचं शिवी देली असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

भारताने दुसरा ट्वेंटी-20  सामना संपल्यानंतर क्रीडा पत्रकार जतीन सप्रु युजवेंद्र चहलची मुलाखत घेत होता. मात्र चहल त्याच्या बाजूला गप्पा मारत असलेल्या भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गुप्तील यांच्याकडे माइक घेऊन गेला आणि व्हॉट्सअप बॉयज? असा सवाल विचारला. चहलच्या या प्रश्नावर कधी हिंदी न बोलणाऱ्या  मार्टिन गुप्तीलने ************ अशा शब्दात चहलला शिवी दिली. हा सर्व प्रकार थेट टिव्हीवर प्रदर्शित होत असल्याचे शेजारी उभा असलेल्या रोहित शर्माच्या लक्षात आले. यानंतर रोहितने कॅमेऱ्याच्या फ्रेमपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. पण भारताच्या किंवा न्यूझीलंडच्या कोणत्याही खेळाडूला दंड ठोठावण्यात आलेला नाही.

क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे. त्यामुळे या खेळात तुमची गुणवत्ता, कामगिरी महत्वाची आहेच, पण त्याचबरोबर तुमची वर्तणूकही तितकीच महत्वाची आहे. सामन्यादरम्यान गैरवर्तन केल्यामुळे एका खेळाडूला दंड भरावा लागला आहे.

सामना सुरु असताना अश्लील भाषा वापरल्यामुळे या खेळाडूवर दंड ठोठावण्यात आला आहे. सामन्याच्या मानधनाच्या १५ टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्याच्याकडून ही गोष्ट दुसऱ्यांदा घडली आहे. त्यामुळे त्याला डीमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात ही गोष्ट पाहायला मिळाली. हा सामना इंग्लंडने जिंकला. पण या सामन्यादरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसशी संवाद साधताना अश्लील भाषा वापरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ब्रॉडवर आयसीसीने दंड आकारला आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडइंग्लंडस्टुअर्ट ब्रॉडद. आफ्रिका