मुंबई : आता काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे तो ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा. पण या स्पर्धेमध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकातील कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळेच इंग्लंडमध्ये फारशी चांगली कामगिरी न करता आलेल्या या खेळाडूला आता ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळता येणार नसल्याचे म्हटले जात आहे.
दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपद फॅफ ड्यू प्लेसिसकडून क्विंटन डीकॉककडे सोपवण्यात आले आहे. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाची तयारी करण्यासाठी संघामध्ये असा बदल करण्यात आला आहे. फॅफला इंग्लंडमधल्या विश्वचषकात चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याच्याकडून संघाचे कर्णधारपद काढण्यात आले आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकातही फॅफ संधी मिळणार नसल्याचेच दिसत आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर धुळ चालणारी टीम इंडिया आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. आफ्रिकेचा संघ तीन ट्वेंटी-20 आणि तीन कसोटी सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. 15 सप्टेंबरपासून ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. उभय देशांमध्ये ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारताचे पारडे जड आहे. भारताने 13पैकी 8 सामने जिंकले आहेत, तर आफ्रिकेला 5 सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे आगामी मालिकेत कोणाचे पारडे जड असेल, हे लवकरच कळेल. कसोटीत मात्र आफ्रिकेने 36पैकी 15 सामने जिंकले आहेत, तर केवळ 11 मध्ये त्यांना हार पत्करावी लागली आहे. चला तर मग जाणून घेऊया कसा असेल आफ्रिकेचा भारत दौरा...
भारत आणि आफ्रिका यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना धर्मशाला येथे 15 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर मोहाली आणि बंगळुरु येथे 18 व 22 सप्टेंबरला ट्वेंटी-20 सामने होतील. धर्मशाला येथे होणाऱ्या सामन्यातील 40 टक्के तिकिटांची विक्री झाली आहे
संपूर्ण वेळापत्रक
ट्वेंटी-20
पहिला सामनाः 15 सप्टेंबर - धर्मशाला, वेळ - सायंकाळी 7 वाजल्यापासून
दुसरा सामनाः 18 सप्टेंबर - मोहाली, वेळ - सायंकाळी 7 वाजल्यापासून
तिसरा सामनाः 22 सप्टेंबर - बंगळुरू, वेळ - सायंकाळी 7 वाजल्यापासून
कसोटी
पहिला सामनाः 2 ते 6 ऑक्टोबर - विशाखापट्टणम, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
दुसरा सामनाः 10 ते 14 ऑक्टोबर - पुणे, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
तिसरा सामनाः 19 ते 23 ऑक्टोबर - रांची, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
भारताचा ट्वेंटी-20 संघ ः विराट कोहली ( कर्णधार) , रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीन सैनी.
दक्षिण आफ्रिकेचा ट्वेंटी-20 संघ : क्विंटन डि कॉक (कर्णधार), रॉसी व्हॅन डेर डुसेन, तेंबा बावुमा, ज्युनिअर डाला, ब्योर्न फोर्चुन, बुरान हेंड्रीक्स, रीजा हेंड्रीक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नोर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरीयस, कागिसो रबाडा, तरबेझ शम्सी, जॅन जान स्मट्स.
दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघः फॅफ ड्यू प्लेसिस ( कर्णधार), टेंबा बवुमा, थेयूनिस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गर, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडन मार्क्राम, सेनुरन मुथूसामी, लुंगी एनगिडी, अॅनरीच नोर्टजे, व्हेर्नोन फिलेंडर, डॅन पिएड्त, कागिसो रबाडा, रुडी सेकंड.
Web Title: 'This' player will not play in Twenty20 World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.