Join us  

विराट सक्षम मानसिकतेने खेळतोय...

पहिल्या डावात विराट कोहलीने ‘ग्रेट’ खेळी केली. भारतीय क्रिकेटचा इतिहास बघितला तर त्यामधील ही एक सर्वाेच्च खेळी म्हणता येईल. विराटला दोन वेळा जीवदान मिळाले खरे; पण नंतर त्याने संघाला संकटातून बाहेर काढले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 1:10 AM

Open in App

- अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)पहिल्या डावात विराट कोहलीने ‘ग्रेट’ खेळी केली. भारतीय क्रिकेटचा इतिहास बघितला तर त्यामधील ही एक सर्वाेच्च खेळी म्हणता येईल. विराटला दोन वेळा जीवदान मिळाले खरे; पण नंतर त्याने संघाला संकटातून बाहेर काढले.५-६ विकेट्स झटपट गेल्या होत्या. अशा स्थितीत संघाला संकटातून बाहेर काढणे, ही मोठी गोष्ट असते. गेल्या दौऱ्यात म्हणजे २०१४ मध्ये विराटने १० डावांत एकूण १३४ धावा केल्या होत्या. या दौºयात त्याने पहिल्याच डावात १४९ धावा केल्या.जेव्हा एखाद्या फलंदाजाचा झेल सुटतो आणि त्याला जीवदान मिळते तेव्हा त्याच्यावर दबाव वाढतो; कारण तोच फटका परत खेळला जाऊ नये याच्या काळजीत तो असतो. यातून विराटने मात्र आपले कौशल्य दाखवले. पहिल्या डावात भारतीय संघ केवळ १३ धावांनी पिछाडीवर राहिला. दबाव मात्र इंग्लंडवर दिसून आला.२०१४ मध्ये विराट कोहली जेव्हा इंग्लंड दौºयावर आला होता तेव्हा तो २५ वर्षांचा होता. फलंदाजाचा अनुभव वाढतो, तेव्हा तो बºयाच गोष्टी शिकत असतो. जो महान खेळाडू असतो तो आपल्या कमकुवत बाजूंवर खूप मेहनत घेत असतो. हीच गोष्ट विराटबाबत लागू होते. आपण देशाबाहेरील दौरे बघितले तर लक्षात येईल. खासकरून दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया या दौºयांत सर्वात यशस्वी फलंदाज ठरलाय तो विराट कोहली. या वेळी त्याने निश्चय केला होता की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत इंग्लंडमध्ये चांगले खेळायचे आहे. यासाठी त्याने कौंटी क्रिकेट आणि सराव सामनेही खेळण्याची इच्छा दाखवली होती. मात्र, तो खेळू शकला नाही. मला वाटते, जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळता तेव्हा तुम्ही मानसिकरीत्या अधिक मजबूत झालेले असता. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली हे खेळाडू पाहिले तर लक्षात येईल. विराटने आतापर्यंत २२ शतके झळकाविली आहेत. आता तर त्याचे अर्धे करियरही संपले नाही. माझ्या मते, त्याने मानसिक तयारी केली आहे आणि तो त्याच पद्धतीने खेळणार आहे.दुसरीकडे, ‘टॉप आॅर्डर’ ढासळते तेव्हा दु:ख होते; कारण विराटला दुसºया बाजूने साथ मिळत नाही. शिखर धवन जो लांब खेळी करण्यात अपयशी ठरत आहे. चेतेश्वर पुजाराने आपली जागा गमावली. राहुल अपयशी ठरला. अजिंक्य रहाणे सेट होईल असे वाटत असताना बाद झाला. दिनेश कार्तिकने निराशा केला. मला वाटते, एकटा विराट कोहली पाचही कसोटींत अशीच कामगिरी करेल, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.इतर फलंदाजांनी योगदान देणे महत्त्वाचे आहे.गोलंदाजीबाबत सांगायचे झाल्यास जलदगती गोलंदाज चांगले प्रदर्शन करीत आहेत. आतापर्यंत अश्विन आणि मोहम्मद शमी हे चमकले आहेत. शमीवर मोठा दबाव होता. आपल्या कौटुंबिक समस्येच्या गर्तेतून सावरत तो दौºयावर आला आहे.भुवनेश्वर न खेळल्यामुळे त्याला संघात जागा मिळाली. त्याने पहिल्या डावात चांगली गोलंदाजी केली. अश्विनचा चेंडू फलंदाजांना चकवत होता. कालप्रमाणेच त्याने गोलंदाजी केली तर तो इंग्लंडला संकटात आणू शकतो. आतापर्यंत सामन्यात बरोबरीची टक्कर दिसून आली. इंग्लंडकडे रविचंद्रन अश्विनसारखा गोलंदाज नाही. आदिल रशिद आहे; पण त्याच्यापासून भारताला इतका धोका नाही. त्यामुळे अश्विनकडून अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही.

टॅग्स :विराट कोहलीक्रिकेट