Ranji Trophy: 36 धावांत 8 विकेट! अष्टपैलू खेळाडूने रचला इतिहास; 400 बळी घेणारा ठरला पहिला खेळाडू

जलज सक्सेना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 400 बळी घेणारा पहिला अनकॅप्ट खेळाडू ठरला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 04:44 PM2023-01-13T16:44:52+5:302023-01-13T16:45:37+5:30

whatsapp join usJoin us
 Playing for Kerala in the Ranji Trophy, Jalaj Saxena took 8 wickets for 36 runs and completed 400 wickets in first-class cricket with this  | Ranji Trophy: 36 धावांत 8 विकेट! अष्टपैलू खेळाडूने रचला इतिहास; 400 बळी घेणारा ठरला पहिला खेळाडू

Ranji Trophy: 36 धावांत 8 विकेट! अष्टपैलू खेळाडूने रचला इतिहास; 400 बळी घेणारा ठरला पहिला खेळाडू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेचा थरार रंगला आहे. केरळच्या संघाने शुक्रवारी रणजी ट्रॉफीमध्ये सर्व्हिसेसचा पराभव केला. केरळने 204 धावांच्या फरकाने मोठा विजय मिळवला. यादरम्यान देशांतर्गत क्रिकेटचा अनुभवी आणि केरळ संघाचा महत्त्वाचा भाग असलेल्या जलज सक्सेनाने आपल्या अप्रतिम खेळीने सर्वांचे लक्ष वेधले. केरळने सर्व्हिसेससमोर 341 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे सर्व्हिसेसच्या संघाला गाठता आले नाही. खरं तर सर्व्हिसेसचा संघ अवघ्या 136 धावांवर गारद झाला. जलजने या सामन्याच्या चौथ्या डावात 8 बळी घेतले. यादरम्यान त्याने प्रथम श्रेणीतील 400 बळी पूर्ण केले.

जलजने रचला इतिहास 
दरम्यान, जलजने 15.4 षटके टाकली आणि 36 धावांत आठ गडी बाद केले. या हंगामातील रणजी ट्रॉफीच्या पाच फेऱ्यांमध्ये जलजने 5 वेळा पाच बळी घेण्याची किमया साधली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 400 बळी घेणारा आणि 6000 हून अधिक धावा करणारा तो भारताचा पहिला अनकॅप्ड अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. 

भारतीय संघात मिळणार संधी? 
जलजने मागील अनेक दिवसांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. उजव्या हाताचा फलंदाज आणि अष्टपैलू जलज केरळपूर्वी मध्य प्रदेशच्या संघाकडून खेळला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघाचा दरवाजा अनेकवेळा ठोठावला. पण महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि आता रोहित शर्मा यांनी जलजला संधी दिली नाही. मात्र, आता पुन्हा एकदा जलजने आपली अप्रतिम खेळी दाखवून भारतीय संघाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळे जलजला आगामी काळात भारतीय संघात संधी मिळणार का हे पाहण्याजोगे असणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

  
 

Web Title:  Playing for Kerala in the Ranji Trophy, Jalaj Saxena took 8 wickets for 36 runs and completed 400 wickets in first-class cricket with this 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.