नवी दिल्ली : आइसलॅंड क्रिकेट नेहमी आपल्या अनोख्या ट्विटमुळे चर्चेत राहत असते. अलीकडेच त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका आयोजित करावी अशा इंग्लंडच्या ऑफरवर भन्नाट ट्विट केले होते. खरं तर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेचे आयोजन करण्याची ऑफर दिली होती. आता पुन्हा एकदा आइसलॅंड क्रिकेट त्यांच्या ट्विटमुळे चर्चेचा विषय बनले आहे. भारतीय संघाविरूद्ध आइसलॅंडने टी-२० सामना खेळणे म्हणजे फुटबॉलमध्ये ब्राझील विरुद्ध सॅन मारिनो सारखे होईल. अशा शब्दांत त्यांनी भारतीय संघाचे नकळत कौतुक केले असून भारत बलाढ्य संघ असल्याचे म्हटले आहे.
इंग्लंडच्या ऑफरवर मजेशीर टिप्पणी करताना आइसलॅंड क्रिकेट बोर्डाने ट्विटच्या माध्यमातून म्हटले होते, "आम्ही ऐकले आहे की इंग्लंडने IND vs PAK यांच्यात कसोटी मालिका आयोजित करण्याची ऑफर दिली आहे. आम्हीही अधिकृतपणे अशी घोषणा करतो की आयसीसी आम्ही देखील अशी ऑफर देत आहोत. जून आणि जुलैमध्ये २४ तास यासाठी सुविधा पुरवली जाईल. याशिवाय सामने कव्हर करणारे मजेशीर ट्विट देखील केले जातील."
भारताविरूद्ध खेळण्यापूर्वी आम्हाला लहान संघांशी खेळायला हवं
"आइसलॅंडने टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा सामना केला तर ते फुटबॉलमध्ये ब्राझील विरुद्ध सॅन मारिनो यांचा सामना झाल्यासारखे होईल. आम्हाला जिब्राल्टर, लॅटव्हिया, पोलंड आणि लिथुआनिया सारख्या इतर लहान खेळाडूंशी प्रथम स्पर्धा करायची आहे. नंतर आम्ही इतर नॉर्डिक राष्ट्रांना, नंतर डच आणि स्कॉट्स यांना पराभूत करू. हा विजयाच क्रम आहे", अशा शब्दांत आइसलॅंड क्रिकेटने भारताविरूद्ध तूर्तास कोणताही सामना खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आइसलॅंड क्रिकेट बोर्ड नेहमी भन्नाट ट्विट करून लक्ष वेधत असते.
Web Title: Playing T20 against India will be like Brazil vs San Marino in football, says Iceland Cricket Board
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.