इंदूर : माझ्या मोठ्या खेळीचे रहस्य ताकद नव्हे तर अचूक टायमिंग आहे. मैदान पाहून अनुकूल खेळ करीत असल्यानेच धावा काढण्यात यशस्वी होतो, असे सलामीवीर आणि काळजीवाहू कर्णधार रोहित शर्मा याचे मत आहे.
सर्वांत वेगवान टी-२० शतक झळकविल्यानंतर रोहित म्हणाला, ‘माझ्याकडे फटके मारण्यासाठी मोठी ताकद नाही, पण टायमिंग आहे. अचूक टायमिंगमध्येच फटके मारण्यास मदत होते. मैदान पाहून त्यानुसार मी खेळ करतो. मी ख्रिस गेलसारखा ‘पॉवर हिटर’ नसलो तरी अचूक टायमिंगच्या बळावर सहजपणे चौकार-षटकार ठोकू शकतो.’ रोहित हा वन-डेत तीन द्विशतके आणि टी-२० मध्ये शतक ठोकणारा एकमेव फलंदाज आहे.
रोहितची सध्याची फटकेबाजी बघता टी-२० त तो द्विशतकी खेळू
करू शकेल, असे वाटते. पण रोहित स्वत: याबाबत विचार करीत नाही. यावर तो म्हणाला,‘मी केवळ धावा काढण्याचाच विचार करतो. कुठलेही लक्ष्य आखून खेळायचे
नाही. क्रिकेटमध्ये कुठला तरी
रेकॉर्ड होईल, या इराद्याने मी कधीही खेळत नाही.’ (वृत्तसंस्था)
सहा षटकांच्या खेळानंतर फिल्डिंगमध्ये काहीसा बदल होतो. तेव्हाच मी चौकार कुठल्या ठिकाणी मारू शकतो, हे जाणून घेण्यासाठी मैदानाचा वेध घेतो. मैदानावर चौफेर फटकेबाजी आधी विरोधी खेळाडू कुठे क्षेत्ररक्षण करीत आहेत, हे
पाहणे गरजेचे आहे. सर्वच प्रकारात माझा असाच करण्याचा प्रयत्न असतो. चौफेर फटकेबाजीमुळे प्रतिस्पर्धी संघात तुम्ही धडकी भरवू शकता. तुमचा धसका घेतल्यामुळे अधिक धावा घेणे शक्य होते. माझी ताकद हीच आहे.
- रोहित शर्मा,
भारतीय कर्णधार,
Web Title: Playing through the field, not more power, but more time for timing - Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.