Join us  

यॉर्कशायरकडून खेळल्याने फायदा होईल - चेतेश्वर पुजारा

एप्रिलमध्ये देशातील आघाडीचे क्रिकेटपटू आयपीएल खेळत असताना कसोटीतील तज्ज्ञ खेळाडू चेतेश्वर पुजारा भारताच्या इंग्लंड दौ-याचा होमवर्क सुरू करणार आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 3:58 AM

Open in App

नवी दिल्ली : एप्रिलमध्ये देशातील आघाडीचे क्रिकेटपटू आयपीएल खेळत असताना कसोटीतील तज्ज्ञ खेळाडू चेतेश्वर पुजारा भारताच्या इंग्लंड दौ-याचा होमवर्क सुरू करणार आहे. या काळात पुजारा इंग्लिश काउंटी संघ यॉर्कशायरकडून डिव्हिजन एकमध्ये खेळेल. त्याचे लक्ष आॅगस्ट महिन्यात इंग्लंड विरोधात होणाºया पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या तयारीवर असेल.पुजारा याने कोटला मैदानावर बोलताना सांगितले की, ‘ मी काउंटी सत्रात चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेल. कारण आम्ही आॅगस्ट महिन्यात इंग्लंडमध्ये कसोटी खेळणार आहोत. २०१५मध्ये मी यॉर्कशायरसोबत होते. तेव्हा आम्ही काऊंटी चॅम्पियनशिप पटकावली होती. हा एक शानदार संघ आहे. या संघात अनेक व्यावसायिक क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे मला उत्कृष्ट क्रिकेटपटू होण्यात मदत मिळाली.’पुजाराच्या मते काऊंटी क्रिकेट खेळल्याने भारत दौºयाआधीच त्याला मैदान, खेळपट्टीबाबत चांगली माहिती मिळेल.पुजारा म्हणाला की, ‘इंग्लंडमध्ये या सत्रात सुरुवातीला हेडिंग्लेमध्ये खेळणे ही कोणत्याही फलंदाजाच्या तंत्राची परीक्षा असते. कारणयेथे तापमान चार ते सहा डिग्री असते. येथे ५० धावा करणेदेखील कठीण होते. मात्र जेव्हा भारताचा दौरा सुरू होईल, तेव्हा वातावरण प्रफुल्लीत होईल.’ (वृत्तसंस्था)