IPL 2022 Final & Play Off : आयपीएल प्ले ऑफ व फायनल बाबत Jay Shah यांची मोठी घोषणा; पुण्याला मिळाला आणखी ४ सामन्यांचा मान!

IPL 2022 Final & Play Off : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या फायनलची तारीख अन् ठिकाणाची अधिकृत घोषणा अखेर झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 06:01 PM2022-05-03T18:01:39+5:302022-05-03T20:19:04+5:30

whatsapp join usJoin us
Playoff Stage of IPL 2022 will be held in Ahmedabad & Kolkata. Mega final will be at Narendra Modi Stadium on May 29, BCCI Secy Jay Shah | IPL 2022 Final & Play Off : आयपीएल प्ले ऑफ व फायनल बाबत Jay Shah यांची मोठी घोषणा; पुण्याला मिळाला आणखी ४ सामन्यांचा मान!

IPL 2022 Final & Play Off : आयपीएल प्ले ऑफ व फायनल बाबत Jay Shah यांची मोठी घोषणा; पुण्याला मिळाला आणखी ४ सामन्यांचा मान!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Final & Play Off : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या फायनलची तारीख अन् ठिकाणाची अधिकृत घोषणा अखेर झाली. साखळी फेरीतील ७० सामन्यांचा मान मुंबई, पुणे व नवी मुंबईला दिल्यानंतर प्ले ऑफ व अंतिम सामना कुठे खेळवला जाईल याची उत्सुकता होती. आयपीएल २०२२ची फायनल अहमदाबाद येथे २९ मे ला खेळवण्यात येईल, तर प्ले ऑफ व एलिमिनेटर २४ व २६ मे ला कोलकाता येथे खेळवण्यात येणार आहे. दुसरी प्ले ऑफ २७ मे ला अहमदाबाद येथे होईल. याशिवाय पुण्याला अतिरिक्त ४ सामन्यांच्या आयोजनाचा मान दिला गेला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी (Jay Shah) ANI शी बोलताना हे जाहीर केले.

''नरेंद्र मोदी स्टेडियमवर २७ मे रोजी दुसरा क्वालिफायर सामन्यासह २९ तारखेला फायनल होणार आहे. कोलकाता येथे क्वालिफायर १ व एलिमिनेटरच्या लढती अनुक्रमे २४ व  २५ मे ला खेळवण्यात येतील,''असे जय शाह यांनी सांगितले.  


महिला ट्वेंटी-२० चॅलेंज स्पर्धेचेही पुनरागमन होत आहे. सुरुवातीला महिला ट्वेंटी-२० चॅलेंजच्या लढती लखनौ  येथे होतील अशी शक्यता होती. पण, त्याच्या यजमानपदाचा मान पुण्याला दिला गेला आहे. २३, २४, २६ व २८ मे या तारखांना पुण्यात या लढती खेळवण्यात येतील. 

Web Title: Playoff Stage of IPL 2022 will be held in Ahmedabad & Kolkata. Mega final will be at Narendra Modi Stadium on May 29, BCCI Secy Jay Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.