भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबतच्या चर्चा संपता संपेना. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. त्यामुळे मुंबईत रविवारी झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) सर्वसाधारण सभेतही धोनीच्या निवृत्तीबाबत अध्यक्ष सौरव गांगुलीला विचारण्यात आला. धोनी आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे का, या प्रश्नावर गांगुली भडकला.
निवड समिती अध्यक्ष आता निवडणार नाही भारताचा संघ; बीसीसीआयच्या बैठकीत गांगुलींचा मोठा निर्णय
वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीनं वेस्ट इंडिज दौरा, मायदेशात झालेली दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला. 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज मालिकेतली धोनीचा टीम इंडियात समावेश नाही. त्यामुळे पुन्हा एकदा धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मुंबईत एका कार्यक्रमात धोनीलाही हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यानं जानेवारीपर्यंत काही विचारू नका असे उत्तर दिले.
सौरव गांगुलीचा मोठा निर्णय; आता क्रिकेटची लीग करणार बंद?
गांगुलीनं मात्र या प्रश्नावर भडकला. तो म्हणाला,''हा प्रश्न तुम्ही धोनीलाच विचारा. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला आणखी बराच कालावधी आहे. पण, पुढील तीन महिन्यांत चित्र स्पष्ट होईल. काही गोष्टी सार्वजनिकरित्या सांगता येत नाहीत. धोनीबद्दलही योग्य निर्णय घेतला जाईल आणि तुम्हाला त्याचे उत्तर मिळेल.'' धोनीचं टीम इंडियासाठी अमुल्य योगदान आहे आणि त्याच्याबद्दल असा कोणताही निर्णय घेताना सर्व गोष्टींचा विचार केला जाईल. गांगुली म्हणाला,''बीसीसीआय, धोनी आणि निवड समिती यांच्यात पारदर्शकता आहे. धोनीसारख्या दिग्गजाबाबत निर्णय घ्यायचा झाल्यास काही चर्चा हा बंद दरवाजातच ठेवायला हव्यात.'' ‘बीसीसीआय’मध्ये चालणार २०२४ पर्यंत ‘दादा’गिरी, सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी घेण्याचा निर्णयसौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयने रविवारी आपल्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ मर्यादित करणा-या प्रशासकीय सुधारणांचे नियम शिथिल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये सचिव जय शाह प्रतिनिधित्व करतील.
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीचा कार्यकाळ वाढविण्यासाठी कार्यकाळाबाबतच्या मर्यादेबाबत असलेला नियम शिथिल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी घेणे आणि शाह यांना आयसीसीच्या बैठकीमध्ये प्रतिनिधित्व करण्यास मान्यता प्रदान करणे, हे निर्णय बीसीसीआयच्या ८८ व्या वार्षिक आमसभेमध्ये घेण्यात आले.
आमसभेनंतर बोलताना गांगुली म्हणाले,‘शेवटी निर्णय न्यायालयाच घेणार आहे.’ सध्याच्या घटनेनुसार जर कुठल्या पदाधिकाºयाने बीसीसीआय किंवा राज्य संघटना यामध्ये एकूण तीन वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण केले असतील तर त्याला तीन वर्षांचा अनिवार्य ब्रेक घ्यावा लागेल. गांगुली यांनी २३ आॅक्टोबर रोजी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांना पुढील वर्षी पद सोडावे लागेल, पण सूट मिळाली तर ते २०२४ पर्यंत पदावर कायम राहू शकतील.