बंगळुरु : ‘सर्वांना विनंती आहे की, कृपया मला किंग म्हणू नये. यामुळे मला लाजल्यासारखे वाटते,’ अशी कळकळीची विनंती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (आरसीबी) स्टार फलंदाज विराट कोहली याने आपल्या चाहत्यांना केली.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीने मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये कोहलीसाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी, डब्ल्यूपीएल जेतेपद पटकावणाऱ्या आरसीबीच्या महिला संघाचा सत्कारही करण्यात आला. यंदाच्या आयपीएलमध्ये सलामी लढत आरसीबी-चेन्नई सुपरकिंग्ज अशी रंगणार आहे. आरसीबीच्या कार्यक्रमादरम्यान स्टेडियमवरील मोठ्या स्क्रीनवर कोहली दिसताच प्रेक्षकांनी ‘किंग कोहली’चा नारा दिला. यावेळी, चाहत्यांचे प्रेम पाहून कोहलीही भारावला. परंतु त्याने चाहत्यांना एक विनंतीही केली.
कोहली म्हणाला की, ‘कृपया मला ‘किंग’ बोलू नका, मला लाजल्यासारखं वाटतं. आजच आम्हाला चेन्नईसाठी रवाना व्हायचं आहे. आमचं चार्टर्ड विमान सज्ज आहे, त्यामुळे आमच्याकडे पुरेसा वेळ नाही. पण, मी तुम्हाला आवाहन करू इच्छितो की, सर्वप्रथम मला किंग बोलणं सोडा. कृपया मला विराटच बोला. मी आता फाफ डूप्लेसिसला हेच सांगत होतो, की जेव्हा तुम्ही मला किंग बोलावता तेव्हा लाजल्यासारखं वाटतं. त्यामुळे मला विराट म्हणूनच हाक मारा, आजपासून मला किंग बोलणं सोडा.’
Web Title: Please don't call me King : Virat Kohli, appeals to fans
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.