लखनौ : सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. पाहुण्या किवी संघाने मालिकेतील सलामीचा सामना जिंकून आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात यजमान भारतीय संघाने विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. 'करा किंवा मरा'च्या लढतीत भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. पण, 100 धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक सेनेला संघर्ष करावा लागला. न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद केवळ 99 धावा केल्या. किवी संघाकडून कोणत्याच फलंदाजाला 20 धावांचा आकडा गाठता आला नाही.
सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने 19.5 षटकांत धावांचा पाठलाग केला. सूर्यकुमार यादव 26 धावा करून नाबाद राहिला तर हार्दिक पांड्याने 15 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवला दुसऱ्या सामन्यात सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. मात्र, सूर्याने मोठी खेळी नसली तरी त्याला हा पुरस्कार दिल्याने चाहते संभ्रमात आहेत. सूर्याने 31 चेंडूत 26 धावांची नाबाद खेळी केली.
सूर्याने चहलची घेतली फिरकी दरम्यान, युझवेंद्र चहल, सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव यांचा एक भन्नाट व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. चहलने सूर्याला मजेशीरपणे म्हटले, "तू जसा माझ्याकडून 360 शॉर्ट खेळायला शिकला, त्यासाठी तू माझी रेड बॉल क्रिकेटमधील व्हिडीओ पाहिली आहेस ना?". चहलच्या प्रश्नाला सूर्याने देखील भन्नाट उत्तर दिले. "होय, जस तू मला शेवटच्या मालिकेत शिकवले आहेस, तसे तू आणखी शिकवावे असे मला वाटते. प्रेक्षकांनो, कृपया हलक्यात घेऊ नका हा माझा बॅटिंग कोच आहे", अशा शब्दांत सूर्याने चहलची फिरकी घेतली.
भारताने मालिकेत साधली बरोबरी दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवी संघाला केवळ 99 धावा करता आल्या. भारताकडून अर्शदीप सिंगने 2 षटकांत 7 धावा देत सर्वाधिक 2 बळी घेतले. सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने 19.5 षटकांत धावांचा पाठलाग केला. सूर्यकुमार यादव 26 धावा करून नाबाद राहिला तर हार्दिक पांड्याने 15 धावांची खेळी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"