Join us  

कॅप्टन बदलून काहीच होणार नाही; Irfan Pathanचे स्पष्ट मत, सांगितला हार्दिकला कर्णधार बनवण्याचा धोका 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघातील सीनियर खेळाडूंना ट्वेंटी-२०तून विश्रांती देऊन  नवा कर्णधार निवडण्याची मागणी होताना दिसतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 1:28 PM

Open in App

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघातील सीनियर खेळाडूंना ट्वेंटी-२०तून विश्रांती देऊन  नवा कर्णधार निवडण्याची मागणी होताना दिसतेय. BCCI ने २०२४ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीला सुरूवात केली आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याचे नाव भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून आघाडीवर आहे. आगामी दोन वर्षांत हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघ तयार करण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. हार्दिकने त्याच्या नेतृत्वाच्या पदार्पणात गुजरात टायटन्सला इंडियन प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावून दिले आहे. पण, कर्णधार बदलून काहीच होणार नाही, असे स्पष्ट मत मांडताना भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण ( Irfan  Pathan) याने हार्दिकला कॅप्टन बनवण्याचा धोकाही सांगितला.

MS Dhoni in Team India : टीम इंडियाच्या मदतीसाठी महेंद्रसिंग धोनीची IPLमधून निवृत्ती?; BCCI राहुल द्रविडचा भार हलका करणार

IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्सची एन्ट्री झाली आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली त्यांनी जेतेपदही जिंकले. त्यानंतर हार्दिकची आयर्लंड दौऱ्यावर भारताच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. आता त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. हार्दिकला  कर्णधार बनवण्यावरून इरफानचे काही वेगळेच मत आहे. Star Sportsच्या 'Match Point' या कार्यक्रमात इरफानने त्याचे स्पष्ट मत मांडले.

तो म्हणाला,''कर्णधार बदलल्यानंतर निकाल बदलेल, असं मी म्हणणार नाही. जर तुम्ही असंच खेळत राहाल, तर निकालही असाच मिळेल. हार्दिक पांड्याला कर्णधार बनवताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, तो जलदगती अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्याबाबत दुखापतीच्या घटना घडत राहतात. अशात जर वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर त्याला दुखापत झाली तर काय? अशा परिस्थितीत तुमच्याकडे दुसरा पर्याय नसेल, तर पालथ्या घडावर पाणी. हार्दिकने कर्णधार म्हणून गुजरात टायन्सला जेतेपद जिंकून दिले आहे. पण, तुम्हाला दुसरा पर्यायही तयार ठेवायला हवा. सलामीवीरांसाठी जसे पर्याय असतात तसेच कर्णधार म्हणूनही एक पर्याय तयार करायला हवा, असे मला वाटते.''

 

त्यात आज इरफानने भारतीय संघाला विजयाचा मंत्रा दिला. त्याने ट्विट केले की, भारतीय संघाचा कर्णधार बदलून तुम्हाला अपेक्षित निकाल मिळेल असे नाही आणि तसा विचारही करू नका. गरज आहे ते तुमचा दृष्टीकोन बदलण्याची. त्यासाठी भारताच्या सलामीवीरांनी ( किमान एकाने) मुक्तपणे फटकेबाजी करायला हवी, संघात विकेट टेकर Wrist spinner हवाच, वेगवान गोलंदाजाला दमवू नका. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"       

टॅग्स :इरफान पठाणरोहित शर्माहार्दिक पांड्याबीसीसीआय
Open in App