पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघाचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. यूएईत होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या पाकिस्तान संघावरून नाराजी नाट्य सुरू होतं. कर्णधार बाबर आझम हाही या संघानिवडीवर नाखूश असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर आता पंतप्रधानांनीच हस्तक्षेप केल्यामुळे पाकिस्तानच्या संघात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आझम खान, खुशदील शाह, मोहम्मद नवाझ व मोहम्मद सहनैन यांना संघातून डच्चू मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्याजागी फाखर जमान, शर्जील खान, शोएब मलिक, शाहनवाझ दहानी आणि उस्मान कादीर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. आयसीसीच्या नियमानुसार १० ऑक्टोबरपर्यंत संघात बदल केला जाऊ शकतो. सध्या सुरू असलेल्या National T20 Cup स्पर्धेत या खेळाडूंच्या कामगिरीवर रमीझ राजा लक्ष ठेऊन आहेत आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.
पाकिस्तानचा वर्ल्ड कप संघ - बाबर आझम, आसीफ अली, खुशदील शाह, मोहम्मद हाफिज, सोहैब मक्सूद, आझम खान, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, मोहम्मद हस्नैन, शाहिन शाह आफ्रिदी