पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी रविवारी चेन्नईचा दौरा केला. चेन्नईला पोहोचल्यानंतर जेव्हा त्यांचं हेलिकॉप्टर एम.ए.चिदंबरम स्टेडिअम जवळून गेलं तेव्हा त्यांना त्या ठिकाणी सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड या सामना दिसला. यावेळी त्यांना त्याचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हेलिकॉप्टरमधून काढलेल्या सामन्याच्या फोटो शेअर केला. चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांनी दमदार खेळ करताना भारताला पहिल्या डावात ३२९ धावा करून दिल्या. पण, इंग्लंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर फारकाळ जम बसवता आला नाही. रविचंद्रन अश्विनच्या जाळ्यात ते सहज अडकले. इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांवर गुंडाळून टीम इंडियानं पहिल्या डावात १९४ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसअखेर १ बाद ५४ धावा करताना २४९ धावांनी आघाडी वाढवली आहे. शुबमन गिलच्या रुपानं भारताला पहिला धक्का बसला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हेलिकॉप्टरमधून पाहिला India vs England सामना; ट्वीट केला फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हेलिकॉप्टरमधून पाहिला India vs England सामना; ट्वीट केला फोटो
India vs England, 2nd Test : दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे २४९ धावांची आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 5:26 PM
ठळक मुद्देदुसऱ्या दिवसअखेर भारताकडे २४९ धावांची आघाडीइंग्लंडचा संघ १३४ धावांवर सर्वबाद