धोनी, कोहली अन् इतर खेळाडूंनी मतदानासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याचा मोदींचा आग्रह

लोकसभेच्या 543 जागांसाठी देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 03:24 PM2019-03-13T15:24:30+5:302019-03-13T15:25:05+5:30

whatsapp join usJoin us
PM Narendra Modi urges MS Dhoni, Virat Kohli and sporting fraternity to inspire record-breaking voter turnout | धोनी, कोहली अन् इतर खेळाडूंनी मतदानासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याचा मोदींचा आग्रह

धोनी, कोहली अन् इतर खेळाडूंनी मतदानासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याचा मोदींचा आग्रह

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई :  लोकसभेच्या 543 जागांसाठी देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान मतदान होईल आणि 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल आणि 29 एप्रिल अशा चार टप्प्यांमध्ये राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघ विभागण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीला एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निवडणुकीत मोठ्या संख्येनं मतदान व्हावे यासाठी कंबर कसली आहे. नागरिकांनी मतदानाचा हक्क पार पाडावा यासाठी महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी आवाहन करावे, असा आग्रह मोदींनी धरला आहे. त्यांनी सोशल मीडियावर तसे ट्विट केले आहे. 
पाहा ट्विट...  



 









 

Web Title: PM Narendra Modi urges MS Dhoni, Virat Kohli and sporting fraternity to inspire record-breaking voter turnout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.