Join us  

Points Table, IPL 2023: मुंबई इंडियन्सची झेप, लखनऊ पहिल्या स्थानावर; ऑरेंज अन् पर्पल कॅप सध्या कोणाकडे?, पाहा

Points Table, IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सला १९४ षटकांत १७२ धावांत बाद केल्यानंतर मुंबईने २० षटकांत ४ बाद १७३ धावा केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 9:08 AM

Open in App

जो सामना सहजपणे जिंकता येणारा होता, तो सामना मुंबई इंडियन्सने कसाबसा अखेरच्या चेंडूवर जिंकला आणि यंदाचा पहिला विजय मिळवत गुणांचे खाते उघडले. दिल्ली कॅपिटल्सला १९४ षटकांत १७२ धावांत बाद केल्यानंतर मुंबईने २० षटकांत ४ बाद १७३ धावा केल्या. दिल्लीचा हा सलग चौथा पराभव ठरला.

धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने तब्बल २५ डावांनंतर आयपीएल अर्धशतक झळकावले. त्याने सुरुवातीपासून आक्रमणाची सूत्रे आपल्याकडे घेत मुंबईला विजयी मार्गावर ठेवले. परंतु, ईशान किशन बाद झाल्यानंतर त्याची फटकेबाजी मंदावली. रोहित ईशान यांनी मुंबईला ४४ चेंडूंत ७१ धावांची सलामी दिली. यानंतर तिलक वर्माने जबरदस्त आक्रमण करत रोहितसह दुसऱ्या गड्यासाठी ५० चेंडूंत ६८ धावांची भागीदारी केली. १६व्या षटकात वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने सामना फिरवताना तिलक व सूर्यकुमार यादव यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. पुढच्याच षटकात मुस्तफिझूर रहमानने रोहितला बाद झाले. सूर्या पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार ठरला. यानंतर टिम डेव्हिड कॅमरून ग्रीन यांनी मुंबईला विजय मिळवून दिला. 

मुंबई इंडियन्सने या विजयानंतर आयपीएल पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर दिल्लीला १०व्या स्थानी समाधान मानवे लागले आहे. दिल्लीने आतापर्यंत ४ सामन्यांमधून एकही विजय मिळवलेला नाही. लखनऊ सुपय जायट्स पहिल्या क्रमांवकर असून राजस्थान रॉयल्स दुसऱ्या क्रमांवर आहे. तर कोलकाता नाइट रायडर्स तिसऱ्या, गुजरात टायटन्स चौथ्या आणि चेन्नई सुपर किंग्स पाचव्या क्रमांकावर आहे. सहाव्या क्रमांकावर पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सातव्या क्रमांकावर आणि सनराईस हैद्राबाद नवव्या क्रमांकवर आहे. 

ऑरेंज कॅप

शिखर धवन ३ सामन्यात २२५ धावा करून पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्याकडे ऑरेंज कॅप आहे. दुसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर आहे ज्याने ४ सामन्यात २०९ धावा केल्या आहेत. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाड आहे, ज्याने आतापर्यंत ३ सामन्यात १८९ धावा केल्या आहेत. ३ सामन्यांत १७५ धावा करून फाफ डू प्लेसिस चौथ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली ३ सामन्यात १६४ धावा करून पाचव्या क्रमांकावर आहे. 

पर्पल कॅप

लखनऊच्या मार्क वुडने ३ सामन्यात ९ विकेट्स घेत पर्पल कॅपचा ताबा घेतला आहे. दुसऱ्या क्रमांकावर युजवेंद्र चहल आहे ज्याने ३ सामन्यात ८ विकेट घेतल्या आहेत. रशीद खान तिसऱ्या क्रमांकावर आहे. राशिदने ३ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत. बिश्नोई ४ सामन्यात ६ विकेट्ससह चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे आणि अल्झारी जोसेफ ३ सामन्यात ६ विकेट्स घेतल्या आहे.

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरलखनौ सुपर जायंट्स
Open in App