जगज्जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या टीम इंडियाचं आव्हान वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. जिंकता येणारा सामना गमावल्यानं क्रिकेटप्रेमी हळहळले, काही जण खवळले. ऐन मोक्याच्या क्षणी कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा, फिनिशर महेंद्रसिंग धोनी अपयशी ठरल्यानं त्यांच्या नावानं बराच शंख झाला. त्यांच्यासोबतच, भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावरही टीका झाली. चौथ्या क्रमांकाचा पेच शेवटपर्यंत न सुटणं आणि संघाच्या बांधणीत अपयश, या मुद्द्यावरून त्यांना लक्ष्य केलं जातंय. स्वाभाविकच, या 'गुरु'पदासाठी अन्य पर्यायांचा विचार व्हावा, अशी मागणीही झालीय-होतेय. परंतु, विराट कोहली आणि रवी शास्त्री ही जोडी कायम ठेवावी, असंही काही जणांना वाटतंय.
या पार्श्वभूमीवर, तुम्हाला चार पर्याय दिल्यास प्रशिक्षकपदासाठी तुम्ही कुणाला पसंती द्याल?