Mumbai Indians 2 Run Outs, IPL 2022 MI vs PBKS: दोन 'रन-आऊट'ने केला मुंबई इंडियन्सचा घात; सावळ्या गोंधळामुळे पदरी पुन्हा पराभव (Video)

मुंबईच्या पराभवाला खऱ्या अर्थाने दोन रन आऊट कारणीभूत ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 12:01 AM2022-04-14T00:01:46+5:302022-04-14T00:02:16+5:30

whatsapp join usJoin us
Pollard Tilak Varma Two silly Run out costed Mumbai Indians match loss against punjab kings when Suryakumar Yadav was on ground IPL 2022 Video | Mumbai Indians 2 Run Outs, IPL 2022 MI vs PBKS: दोन 'रन-आऊट'ने केला मुंबई इंडियन्सचा घात; सावळ्या गोंधळामुळे पदरी पुन्हा पराभव (Video)

Mumbai Indians 2 Run Outs, IPL 2022 MI vs PBKS: दोन 'रन-आऊट'ने केला मुंबई इंडियन्सचा घात; सावळ्या गोंधळामुळे पदरी पुन्हा पराभव (Video)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Mumbai Indians 2 Run Outs, IPL 2022 MI vs PBKS: मुंबई इंडियन्सच्या संघाने हंगामातील पाचही सामने गमावले. बुधवारी पंजाब किंग्ज विरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला १२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन (७०) आणि मयंक अग्रवाल (५२) यांच्या जोरावर १९८ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना बेबी एबी (४९), सूर्यकुमार यादव (४३) आणि तिलक वर्मा (३६) यांची झुंज अपयशी ठरली. मुंबई इंडियन्सचा खऱ्या अर्थाने दोन रन आऊटने घात केला.

१९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने १७ चेंडूत २८ धावा केल्या. त्यानंतर डेवाल्ड ब्रेविसनेही ४९ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव मैदानात आल्यावर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यांची चांगली भागीदारी सुरू होती. तेवढ्यात मुंबईने गोंधळ घातला. सूर्याने मारलेला चेंडू फिल्डरकडे गेला असतानाही तिलक वर्मा (३६) गोंधळामुळे धावला आणि धावचीत झाला. त्यानंतर मुंबईला ४ षटकात ५० धावा हव्या होत्या. सूर्या आणि पोलार्ड मैदानात होते. पोलार्डने फटकेबाजीला सुरूवातही केली. होती. पण पुन्हा एकदा गोंधळामुळे पोलार्डही (९) बाद झाला. या दोन रन आऊटने मुंबई इंडियन्सचा घात केला. पाहा व्हिडीओ-

तिलक वर्मा रन आऊट-

किरॉन पोलार्ड रन आऊट-

त्याआधी, पंजाबच्या सलामीवीरांनी मुंबईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. कर्णधार मयंक अग्रवालने ३२ चेंडूत ५२ तर शिखर धवनने ५० चेंडूत ७० धावा केल्या. भरवशाचे जॉनी बेअरस्टो (१२), लियम लिव्हिंगस्टोन (२) लवकर बाद झाले. पण जितेश शर्माने (३०*) फटकेबाजी करत पंजाबला १९८ धावांचा टप्पा गाठून दिला.

Web Title: Pollard Tilak Varma Two silly Run out costed Mumbai Indians match loss against punjab kings when Suryakumar Yadav was on ground IPL 2022 Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.