सिडनी : आगामी टी-२० विश्वचषकात बाजी मारायची झाल्यास ऑस्ट्रेलिया संघाकडे महेंद्रसिंग धोनी आणि किरेन पोलार्ड यांच्यासारखे फिनिशर उपलब्ध नसल्याचे मत माजी कर्णधार रिकी पाँटिंगने व्यक्त केले आहे.‘मधली आणि तळाची फळी भक्कम करणारे खात्रीलायक फलंदाज तसेच यष्टिरक्षणातही निपुण असलेला खेळाडू संघात असेल तर एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. फिनिशरची भूमिका निभावणारे खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी नेहमी चिंतेचा विषय राहिला. त्यामुळे विश्वचषक जिंकण्यासाठी तीन-चार षटके खेळून अर्धशतक ठोकणारा तज्ज्ञ फलंदाज संघात हवा, असे मत पाँटिंग यांनी ‘क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू’शी बोलताना व्यक्त केले.‘धोनीने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत हेच काम केल्यामुळे तो निर्विवाद उत्कृष्ट खेळाडू ठरतो. हार्दिक आणि किरोन पोलार्ड हे देखील या श्रेणीत मोडतात. देशासाठी आणि आयपीएल संघांसाठी त्यांनी सामने जिंकले. मधल्या फळीत खेळण्याची या फलंदाजांना सवय झाली. याउलट आमचे आघाडीचे सर्वच फलंदाज बिग बॅशमध्ये आघाडीच्या चार स्थानांवर खेळत असल्याने आमच्याकडे चांगले फिनिशर निर्माण होऊ शकले नाही. ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनिस किंवा मिशेल मार्श हे काम करू शकतात. स्टोयनिसमध्ये मी ही क्षमता पाहतो. दिल्ली कॅपिटल्ससाठी मागच्या सत्रात त्याने अनेकदा अशी कामगिरी केली. जो फिनिशर असेल असा खेळाडू मला माझ्या राष्ट्रीय संघात पाहायला आवडेल,’ अशी अपेक्षा पाँटिंग यांनी व्यक्त केली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ऑस्ट्रेलियाकडे धोनी, पोलार्डसारखे ‘फिनिशर’ नाहीत : रिकी पाँटिंग
ऑस्ट्रेलियाकडे धोनी, पोलार्डसारखे ‘फिनिशर’ नाहीत : रिकी पाँटिंग
विश्वचषक जिंकण्यासाठी तीन-चार षटके खेळून अर्धशतक ठोकणारा तज्ज्ञ फलंदाज संघात हवा, असे मत पाँटिंग यांनी व्यक्त केले.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 8:38 AM