महिलांचा ‘अ’ संघ खेळविल्यास अधिक फायदा- पूनम राऊत

पुरुष क्रिकेटप्रमाणे महिलांसाठीही भारत ‘अ’ संघांच्या सामन्यांचे व मालिकांचे आयोजन करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतल्यास खूप आनंद होईल. त्यामुळे मुलींना अधिक अनुभव येईल, अशी प्रतिक्रिया भारताची स्टार महिला फलंदाज पूनम राऊतने दिली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 04:52 AM2017-09-18T04:52:57+5:302017-09-18T04:53:01+5:30

whatsapp join usJoin us
Poonam Raut: The advantage of women's 'A' team is more advantageous | महिलांचा ‘अ’ संघ खेळविल्यास अधिक फायदा- पूनम राऊत

महिलांचा ‘अ’ संघ खेळविल्यास अधिक फायदा- पूनम राऊत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : पुरुष क्रिकेटप्रमाणे महिलांसाठीही भारत ‘अ’ संघांच्या सामन्यांचे व मालिकांचे आयोजन करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतल्यास खूप आनंद होईल. त्यामुळे मुलींना अधिक अनुभव येईल, अशी प्रतिक्रिया भारताची स्टार महिला फलंदाज पूनम राऊतने दिली.
मुंबईतील कांदिवली येथील पोयसर जिमखान्यावर पूनम राऊत क्रिकेट अकादमीचे खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी भारताची उपकर्णधार हरमनप्रीत कौर आणि यष्टिरक्षक नुझत प्रवीण यांचीही विशेष उपस्थिती होती. पुरुषांप्रमाणे महिलांचेही भारत ‘अ’ संघ तयार करण्याबाबत बीसीसीआय विचार करीत आहे. याबाबत पूनम म्हणाली, ‘सुरुवातीला महिलांसाठी जास्त देशांतर्गत क्रिकेट सामने होत नव्हते. नक्कीच आम्हाला कमी मालिका खेळायला मिळतात; पण आता बीसीसीआयने ‘अ’ संघांचे दौरे सुरू करण्याचा विचार केल्याने महिला क्रिकेटमध्ये अधिक गुणवत्ता येईल.’ याविषयी हरमनप्रीत म्हणाली, ‘विश्वचषकानंतर बीसीसीआयमध्ये महिला क्रिकेटच्या प्रगतीसाठी अनेक निर्णय होत आहेत. याआधी सामने कमी होत होते; पण आता तसे होणार नाही. मुलींना अधिक संधी मिळेल.’
पुढील ध्येयाविषयी पूनम म्हणाली, ‘विश्वचषक जिंकण्याचे अधुरे स्वप्न पूर्ण करायचे आहे. आम्ही जास्तीत जास्त योगदान देऊ. आमच्यामागे खूप मोठा बेंच स्टेÑंथ आहे. त्यांनाही आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करू.’
पूनम राऊत क्रिकेट अकादमीसाठी राज्यभरातून सुमारे २००हून अधिक मुलींनी निवड प्रक्रियेत सहभाग घेतला होता.
यातील निवडक ६५ मुलींना प्रथम निवडण्यात आले. यानंतर सर्वोत्तम ४० मुलींची अंतिम शिबिरासाठी निवड झाली.
दरम्यान, या अकादमीमध्ये क्रिकेटव्यतिरिक्त प्रत्येक मुलीच्या शैक्षणिक अभ्यासाकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती अकादमी व्यवस्थापकांकडून मिळाली.
विश्वचषकानंतर सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे दबाव राहील; पण त्यासाठी आम्ही खूप मेहनतही घेत आहोत. जबाबदारी वाढली असली, तरी आम्ही याकडे सकारात्मकतेने बघतोय. आज आमच्यासाठी सुविधांमध्ये वाढ झाली आहे. अपेक्षांचे ओझेही वाढले आहे; पण आम्ही त्याचा आनंद घेत आहोत. - पूनम राऊत

Web Title: Poonam Raut: The advantage of women's 'A' team is more advantageous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.