Join us  

स्पॉट फिक्सिंगचा आरोप स्वीकारणाऱ्या कनेरियाची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता

सहा वर्षांपूर्वी स्पॉट फिक्सिंगचा आरोप फेटाळल्यानंतर आता यात सहभाग असल्याचे मान्य करणारा निलंबित दानिश कानेरियाविरुद्ध पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) पुन्हा नव्याने चौकशी प्रारंभ करू शकते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 4:49 AM

Open in App

कराची : सहा वर्षांपूर्वी स्पॉट फिक्सिंगचा आरोप फेटाळल्यानंतर आता यात सहभाग असल्याचे मान्य करणारा निलंबित दानिश कानेरियाविरुद्ध पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) पुन्हा नव्याने चौकशी प्रारंभ करू शकते. कनेरियावर २०१२ मध्ये इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आजीवन बंदी घातली होती.कानेरियाप्रकरणी पीसीबीने २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या भ्रष्टाचार विरोधी प्रोटोकॉलचे अनुकरण केले. कानेरिया इंग्लिश कौंटी सामन्यात स्पॉट फिक्सिंग आणि अन्य खेळाडूंना स्पॉट फिक्स करण्यासाठी दोषी आढळला होता.कानेरियाने आजीवन बंदीच्या निर्णयाच्या विरुद्ध अनेकदा अपील केले, पण त्याला निर्दोषत्व सिद्ध करता आले नव्हते. आता त्याला या प्रकरणात ईसीबीला १ लाख पौंडचा दंड भरावा लागणार आहे.पीसीबीच्या विश्वासनीय सूत्राने सांगितले,‘कानेरियाने स्पॉट फिक्सिंगचा आरोप स्वीकारणे गंभीर बाब आहे. या आठवड्यात बोर्डाचे चेअरमन एहसन मनी कायदे समिती आणि बोर्डाच्या भ्रष्टाचार विरोधी समितीच्या अधिकाºयांसोबत चर्चा करणार आहे. त्यात कानेरियाविरुद्ध पुन्हा नव्याचे चौकशी प्रारंभ करायला हवी किंवा नको, यावर चर्चा होईल. कारण त्याने आता भ्रष्टाचारात सहभागी असल्याची कबुली दिली आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :पाकिस्तान