बेंगळुरू : आयपीएलदरम्यान होणाऱ्या महिला टी२० प्रदर्शनी सामन्याचे आयोजन प्ले आॅफदरम्यान होऊ शकते. कारण कार्यक्रम बघता केवळ कालावधीचा पर्याय शिल्लक आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) मिळाली. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने यापूर्वी म्हटले होते की, जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी सामन्यांचे आयोजन सायंकाळी ७ वाजता होऊ शकते.
बोर्डाचे एक अधिकारी सोमवारी बोलताना म्हणाले,‘गेल्या वर्षीप्रमाणे यावेळीही आमच्याकडे केवळ प्लेआॅफदरम्यानचा वेळ शिल्लक आहे, पण बरेच काही निवडणुकांच्या तारखेवर अवलंबून आहे.’ गेल्या वर्षी सुपरनोव्हा व ट्रेलब्लेजर्स यांच्यादरम्यानची लढत दुपारी २ वाजता प्रारंभ झाली होती. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या लढतीसाठी प्रेक्षकांची विशेष उपस्थिती नव्हती.
या लढतीत हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, मेग लॅनिंग, एलिस पॅरी व सूजी बेट््स सारख्या खेळाडूंचा सहभाग होता. पुरुष आयपीएल प्लेआॅफ लढतीपूर्वी हा सामना झाला असला, तरी प्रेक्षकांनी मात्र त्याकडे पाठ फिरवली होती.
अधिकारी म्हणाले, ‘आम्ही निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या घोषणेची प्रतीक्षा करीत आहोत. त्यानंतर आम्ही महिलांच्या लढतीच्या कार्यक्रमाला अंतिम रूप देऊ. या लढतींचे आयोजन दिवसापेक्षा आयपीएल सामना नसेल त्या दिवशी सायंकाळी ७ वाजता करणे योग्य ठरेल. दिवसा अनेक प्रेक्षक ांना सामना बघता येत नाही.’ (वृत्तसंस्था)
Web Title: The possibility of a women's IPL match going on in the playoffs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.