Join us

क्रिकेट विश्वातील सर्वात तरूण आजोबा; शाहीन 'बाप' होताच सासरा आफ्रिदीची लक्षवेधी पोस्ट

PAK vs BAN Test Live Score : शाहीन आफ्रिदीच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 18:31 IST

Open in App

shaheen afridi son : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी शनिवारी बाबा झाला. त्याची पत्नी अंशा आफ्रिदीने एका मुलाला जन्म दिला. पाकिस्तान मायदेशात बांगलादेशविरूद्ध पहिला कसोटी सामना खेळत आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी आफ्रिदीला ही खुशखबर मिळाली. मग बळी घेताच आफ्रिदीने अनोखे सेलिब्रेशन करून त्याच्या घरी आलेल्या नवीन पाहुण्याचे स्वागत केले. बुधवारी कसोटी मालिकेतील सलामीच्या सामन्याला सुरुवात झाली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी मोठी धावसंख्या उभारली. पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात ११३ षटकांत ६ बाद ४४८ धावा करून डाव घोषित केला. प्रत्युत्तरात पाहुण्या बांगलादेशने सर्वबाद ५६५ धावा करून ११७ धावांची आघाडी घेतली.

आपल्या मुलीने मुलाला जन्म देताच तिचा बाप शाहिद आफ्रिदीने एक लक्षवेधी पोस्ट केली. क्रिकेट विश्वात मी सर्वात तरूण आजोबा झालो... तुम्हा सर्व मित्रांकडून मला प्रेमळ संदेश मिळत आहेत. आमच्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो, असे शाहिद आफ्रिदीने पोस्टच्या माध्यमातून म्हटले. 

बाप होताच शाहीनचं अनोखे सेलिब्रेशन

दरम्यान, कसोटी सामना सुरू असताना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला खुशखबर मिळाली. त्याची पत्नी अंशाने मुलाला जन्म दिला आहे. बाप झालेला शाहीन रविवारी कराचीला जाईल आणि दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पुन्हा रावळपिंडीत दाखल होईल. शाहीनच्या या निर्णयामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये अंशाने पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीशी लग्न केले. अंशा ही पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीची मुलगी आहे.  

टॅग्स :पाकिस्तानसोशल व्हायरलशाहिद अफ्रिदी