इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL 2020) १३वे पर्व नुकतेच UAE येथे पार पडले. मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) नं अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून विक्रमी पाचवे जेतेपद पटकावले. आयपीएलनंतर पाकिस्तान सुपर लीगच्या ( PSL) प्ले ऑफ सामनेही खेळवण्यात आले. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती बिग बॅश लिगची ( Big Bash League)... ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. आता तर या लीगमध्ये भारताचा युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी खेळणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण, ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत.
त्यामुळे ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्व नियम आपल्याला माहित आहे, असा दावा करणे सोडा. बिग बॅश लीगचा थरार अजून वाढवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं २०-२० लीगमध्ये तीन नवीन नियम आणले आहेत. त्यामुळे आता BBLमधील संघांचे कर्णधार व प्रशिक्षक यांना रणनिती आखताना आणखी अभ्यास करावा लागणार आहे. बीबीएलचे हे १०वे पर्व आहे आणि १० डिसेंबरपासून या लीगला सुरूवात होणार आहे. १० डिसेंबरला ब्लंडस्टोन अरेनावर हॉबर्ट हरिकेन्स विरुद्ध सिडनी सिक्सेस यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.
काय आहेत हे तीन नवीन नियम ?
Power Surge - या नियमानुसार सहा षटकांचा पहिला पॉवर प्ले हा चार षटकांचा केला गेला आहे. उर्वरित दोन षटकांचा पॉवर प्ले कधी घ्यायचा याचा निर्णय फलंदाजी करणारा संघ घेऊ शकतो. पण, त्यांना ११व्या षटकानंतरच पॉवर प्लेमधील दोन षटकांचा पॉवर प्ले घेता येणार आहे. त्यानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला फक्त दोनच खेळाडू सर्कल बाहेर ठेवता येतील.
X-factor Player - हा खूप मजेशीर नियम आहे. आता कर्णधारांना ११ खेळाडूंची नव्हे तर १२ किंवा १३ खेळाडूंची अंतिम यादी तयार करावी लागणार आहे. त्यानुसार सामन्याच्या १०व्या षटकानंतर १२ वा किंवा १३ वा खेळाडूपैकी कोणीही अंतिम ११मधील एका खेळाडूला रिप्लेस करू शकतो. पण, अट अशी राहिल की ज्या खेळाडूला बदली करणार आहे, त्यानं फलंदाजी केलेली नसावी किंवा एकपेक्षा अधिक षटक टाकलेलं नसावं.
Bash Boost - या नियमाचा दोन्ही संघांना समान फायदा असेल. डावाच्या मध्यंतराला दोन्ही संघाला बोनस गुण मिळवण्याची संधी आहे. जर एखादा संघ धावांचा पाठलाग करत असेल आणि त्यानं लक्ष्य ठेवणाऱ्या संघाच्या १०व्या षटकानंतरच्या धावांपेक्षा अधिक धावा पहिल्या १० षटकांत केल्या, तर त्यांना १ बोनस गुण मिळेल. तसंच लक्ष्याचा बचाव करणाऱ्या संघाच्या तुलनेत प्रतिस्पर्धी संघानं १० षटकांत कमी धावा केल्या, तर पहिली फलंदाजी करणाऱ्या संघाला तो बोनस गुण मिळेल.
Web Title: Power Surges, Bash Boosts, X factor player: Cricket Australia unveil drastic rule changes for upcoming BBL tournament
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.