क्रिकेट विश्वविक्रमवीर प्रणववर पुस्तकात धडा, सीबीएसई बोर्डाकडून दखल

सर्वसामान्य कुटुंबातील प्रणव धनावडे याने ७ जानेवारी २०१६ ला शालेय क्रिकेटमध्ये तब्बल १००९ धावा करून विश्वविक्रमवीर होण्याचा बहुमान मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 01:15 PM2018-07-31T13:15:27+5:302018-07-31T13:15:55+5:30

whatsapp join usJoin us
Pranav Dhanawade's chapter in CBSE board Text book | क्रिकेट विश्वविक्रमवीर प्रणववर पुस्तकात धडा, सीबीएसई बोर्डाकडून दखल

क्रिकेट विश्वविक्रमवीर प्रणववर पुस्तकात धडा, सीबीएसई बोर्डाकडून दखल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कल्याण - सर्वसामान्य कुटुंबातील प्रणव धनावडे याने ७ जानेवारी २०१६ ला शालेय क्रिकेटमध्ये तब्बल १००९ धावा करून विश्वविक्रमवीर होण्याचा बहुमान मिळवला. प्रणवच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल सीबीएसई बोर्डाने घेतली आहे. इयत्ता तिसरीच्या हिंदीच्या पाठ्यपुस्तकात त्याच्या धडाकेबाज खेळावर आधारित ‘वाह रे धडाकेबाज’ हा धडा समाविष्ट केला आहे.
प्रणव हा रामबाग परिसरात राहतो. बैलबाजारातील के.सी. गांधी शाळेत शिकत असतानाच त्यांनी हा विश्वविक्रम केला. वायलेनगर येथील मैदानावर एच.टी. भंडारी कप आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत गांधी शाळेविरुद्ध आर्य गुरुकुल शाळेची लढत होती. त्यात प्रणवने झुंजार खेळी करत नाबाद राहत १००९ धावा केल्या. त्यानंतर, त्याच शाळेतील प्राथमिक विद्यार्थ्यांच्या घटक चाचणी परीक्षेच्या पेपरमध्ये त्याच्यावर आधारित प्रश्नावली तयार करण्यात आली होती. आता तर प्रणवच्या विश्वविक्रमी कामगिरीवर आधारित धडा सीबीएसईच्या अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. खुद्द प्रणवला याबाबत कोणतीच कल्पना नव्हती. प्रणवच्या वडिलांना त्यांच्या मित्राचा फोन आला आणि त्यांना याविषयी माहिती मिळाली. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे त्यांनी हा धडा प्रणवच्या कुटुंबीयांना पाठवला दिला. ही बातमी समजताच प्रणवच्या मित्र आणि कुटुंबीयामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
प्रणवने शालेय क्रिकेटमध्ये खेळताना १००९ धावा क रून अविस्मरणीय खेळी करत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विक्रम मोडीत काढत त्याने रातोरात जागतिक क्रिकेटच्या इतिहासात नवा अध्याय
रचला.
बीसीसीआयने त्याला स्कॉलरशिप देऊन त्याच्या खेळाला प्रोत्साहन दिले. यानंतर, गेली दोन वर्षे आपल्या खेळात व्यस्त असलेला आणि फारसा प्रकाशझोतात नसलेला प्रणव पुन्हा धड्याच्या निमित्ताने चर्चेत आला आहे.

धडा केवळ शिक्षकांसाठी?
- प्रणवचे वडील प्रशांत यांनी हे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे का, याचा शोध घेतला. मात्र, त्यांना अद्याप ते मिळालेले नाही. सचिन तेंडुलकर याने खूप मेहनत घेल्यानंतर त्यांचा अभ्यासक्रमात धडा आला होता.
- प्रणवच्या करिअरच्या सुरुवातीला अभ्यासक्रमात धडा येणे, ही आमच्यासाठी खूपच कौतुकाची बाब आहे. आम्हाला व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आलेल्या या धड्याच्या खाली ‘फक्त शिक्षकांसाठी’, असा उल्लेख दिसत आहे.
- त्यामुळे तो शिक्षकांसाठी आहे की विद्यार्थ्यांसाठी, असा संभ्रम निर्माण झाला आहे. कदाचित, तो विद्यार्थ्यांना पुढील वर्षी अभ्यासक्रमात येणार असेल, असे प्रशांत यांनी सांगितले.

Web Title: Pranav Dhanawade's chapter in CBSE board Text book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.