यंदा स्थानिक सत्रात अधिक सामने खेळविण्यास प्राधान्य

मात्र अधिकाधिक सामने खेळविण्यावर आमचा भर असेल, अशी माहिती महाव्यवस्थापक (क्रिकेट संचालन) सबा करीम यांनी सोमवारी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 03:36 AM2020-04-28T03:36:57+5:302020-04-28T03:37:03+5:30

whatsapp join usJoin us
Prefer to play more matches in the local season this year | यंदा स्थानिक सत्रात अधिक सामने खेळविण्यास प्राधान्य

यंदा स्थानिक सत्रात अधिक सामने खेळविण्यास प्राधान्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : बीसीसीआय यंदा स्थानिक क्रिकेट सत्र (२०२०-२१) आॅगस्टपासून सुरू करण्याच्या विचारात आहे. कोरोना संकटामुळे बोर्डाने पर्यायी योजना आखलेली नाही; मात्र अधिकाधिक सामने खेळविण्यावर आमचा भर असेल, अशी माहिती महाव्यवस्थापक (क्रिकेट संचालन) सबा करीम यांनी सोमवारी दिली.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने(ईसीबी) सर्व स्थानिक आणि आंतरराष्टÑीय क्रिकेट जुलैपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. वृत्तसंस्थेशी बोलताना करीम म्हणाले, ‘आॅगस्ट महिन्याला उशीर आहे. आम्ही कुठलीही पर्यायी योजना आखलेली नाही. प्रत्येक महिन्यात कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊ. मागचे सत्र दुलिप करंडक क्रिकेटसह आॅगस्टमध्ये प्रारंभ झाले होते. मागच्या महिन्यात रणजी करंडकासह समारोप झाला. सत्राची अखेरची स्पर्धा इराणी करंडक सामना होता. रणजी करंडक आटोपताच चार दिवसांनी हा सामना होणार होता मात्र कोरोनामुळे हा सामना अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. आयपीएलचे आयोजनदेखील लांबणीवर टाकण्यात आले आहे.’
सप्ेंटबरमध्ये आयपीएलचे आयोजन शक्य झाल्यास स्थानिक सत्राच्या तारखांशी कसा ताळमेळ साधणार, असे विचारताच माजी यष्टिरक्षक करीम म्हणाले, ‘सध्यातरी यावर भाष्य करणे योग्य नाही. परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू. संधी मिळाल्यास अधिकाधिक सामने खेळविण्याचा प्रयत्न असेल.’
मागच्यावर्षी पुरुष आणि महिला गटात २०३३५ सामन्यांचे आयोजन झाले होते.त्यात सिनियर गटाच्या ४७० सामन्यांचा समावेश आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये २०१८ पासून नवीन संघांची भर पडल्याने सामन्यांची संख्या वाढल्याची माहिती करीम यांनी दिली. (वृत्तसंस्था)

Web Title: Prefer to play more matches in the local season this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.