प्रीतीच्या 'तमाशा'नं वीरू दुखावला, पंजाबला करणार अलविदा?

राजस्थान रॉयल्सकडून झालेल्या पराभवानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबची संघमालकीण प्रीती झिंटा हिने थयथयाट करत सर्वांसमक्ष घातलेला वाद संघाचा मेंटॉर वीरेंद्र सेहवागच्या जिव्हारी लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 10:39 AM2018-05-11T10:39:10+5:302018-05-11T10:44:47+5:30

whatsapp join usJoin us
preity zinta slams Viru after defeat against rajasthan | प्रीतीच्या 'तमाशा'नं वीरू दुखावला, पंजाबला करणार अलविदा?

प्रीतीच्या 'तमाशा'नं वीरू दुखावला, पंजाबला करणार अलविदा?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई -  राजस्थान रॉयल्सकडून झालेल्या पराभवानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबची संघमालकीण प्रीती झिंटा हिने थयथयाट करत सर्वांसमक्ष घातलेला वाद संघाचा मेंटॉर वीरेंद्र सेहवागच्या जिव्हारी लागला आहे. पराभवानंतर डगआऊटमध्ये येत प्रीतीने प्रश्नांची सरबत्ती करत केलेल्या पाणउताऱ्यामुळे वीरू दुखावला असून, तो लवकरच किंग्स इलेव्हन पंजाबला अलविदा करण्याची शक्यता आले. 
 आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाबला 15 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या लढतीत राजस्थानने पंजाबपुढे 159 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाला 143 धावाच करता आल्या. एक बाजू लावून धरणाऱ्या लोकेश राहुलने केलेल्या 95 धावांच्या जिगरबाज खेळीनंतरही पंजाबचा संघ विजयापासून दूर राहिला होता. 
हा पराभव किंग्स इलेव्हन पंजाबची सहमालकीण असलेल्या प्रीती झिंटाला पचवता आला नाही. त्यामुळे या पराभवानंतर ती संघाचा मेंटॉर असलेल्या वीरूवर चांगलीच खवळली. तिने मागेपुढे न पाहता वीरूला पराभवाची कारणे विचारण्यास सुरुवात केली. या सामन्यासाठी वीरूने आखलेल्या रणनीतीवरही तिने ताशेरे ओढले. संघात करुण नायर आणि मनोज तिवारीसारखे फलंदाज असतानाही अश्विनला फलंदाजीत बढती देऊन वरच्या फळीत पाठवण्यावरही तिने नाराजी व्यक्त केली. तसेच पराभवाचे खापर वीरू आणि त्याने केलेल्या प्रयोगांवर फोडले. मात्र  या सर्व प्रसंगात सेहवागने प्रीतीला शांतपणे समजवण्याचा प्रयत्न केला. 
 दरम्यान, पंजाबच्या फ्रँचायझीमधील निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले की, वीरू आणि संघाची सहमालक असलेल्या प्रीतीमध्ये सारे काही आलबेल चाललेले नाही. प्रीतीने याआधीही वीरूच्या निर्णयांवर आक्षेप नोंदवले होते. तसेच वीरुसुद्धा प्रीतीच्या संघ व्यवस्थापनामधील ढवळाढवळीमुळे खूप नाराज झाला आहे. प्रीतीचे सिनेस्टाइल नखरे खपवून घेतले जाणार नाहीत, असे त्याने किंग्स इलेव्हन पंजाबच्या इतर मालकांना सांगितल्याचे वृत्त आहे. प्रीतीने याआधी 2016 साली पंजाबचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या संजय बांगरसोबत वाद घातला होता.  

Web Title: preity zinta slams Viru after defeat against rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.