आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियम लागू करण्याची तयारी

काय आहे ‘इम्पॅक्ट प्लेअर’नियम?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 05:35 AM2022-12-03T05:35:52+5:302022-12-03T05:37:01+5:30

whatsapp join usJoin us
Preparations to implement 'Impact Player' rule in IPL | आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियम लागू करण्याची तयारी

आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियम लागू करण्याची तयारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आयपीएलच्या १५व्या सत्रापासून रणनीतिक बदल (टॅक्टिकल सबस्टिट्युशन) अमलात आणले जातील. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच वापरण्यात आल्यानंतर, ही संकल्पना आता आयपीएलमध्ये लागू करण्याची बीसीसीआयची तयारी आहे. ‘नवीन नियमासह आता नवीन हंगामाची वेळ आली आहे. या आवृत्तीमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाचा मोठा प्रभाव पडेल.’ असे ट्विट आयपीएलने केले आहे. 

काय आहे ‘इम्पॅक्ट प्लेअर’नियम?
प्रत्येक संघ त्यांच्या अंतिम ११ खेळाडूंसह ४ इतर पर्यायी खेळाडूंची नावे देऊ शकतो. या चौघांपैकी अंतिम ११ मधील कोणत्याही खेळाडूला बदलण्यासाठी बोलावले जाऊ शकते. प्रभावशाली खेळाडू बदली क्षेत्ररक्षकाप्रमाणे गोलंदाजी आणि फलंदाजी करू शकतो. मात्र हा बदल डावाच्या १४व्या षटकाच्या आधी केला जाऊ शकतो. कोणत्याही वेळी फ्रँचायझी इलेव्हनमधील ४ परदेशी खेळाडूंची मर्यादा ओलांडू शकत नाहीत. ‘इम्पॅक्ट प्लेअर’ हा आपल्या कोट्यातील षटके टाकू शकेल आणि नव्या फलंदाजाप्रमाणे फलंदाजीही करू शकेल.

Web Title: Preparations to implement 'Impact Player' rule in IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.