संघासाठी योग्य असेल ते करण्याची तयारी : स्मिथ

Steve Smith : मला पुन्हा कर्णधार करण्याबाबत संघात चर्चा सुरू असून संघाच्या हितासाठी जे काही योग्य आहे ते करण्याची माझी तयारी आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने व्यक्त केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 01:15 AM2020-12-11T01:15:16+5:302020-12-11T06:57:07+5:30

whatsapp join usJoin us
Preparing to do what is right for the team: Smith | संघासाठी योग्य असेल ते करण्याची तयारी : स्मिथ

संघासाठी योग्य असेल ते करण्याची तयारी : स्मिथ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ॲडिलेड : मला पुन्हा कर्णधार करण्याबाबत संघात चर्चा सुरू असून संघाच्या हितासाठी जे काही योग्य आहे ते करण्याची माझी तयारी आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने व्यक्त केले. स्मिथ व उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी मार्च २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीमध्ये चेंडू छेडखानी प्रकरणात समावेश असल्यामुळे पद सोडले होते. त्यानंतर टीम कसोटी संघाचे व ॲरोन फिंच मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व करीत आहेत.

ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलताना  स्मिथ म्हणाला, ‘अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनीही याबाबत उत्तर दिले. त्यासाठी एक प्रक्रिया असते ती पूर्ण करावी लागते.’ ३६ वर्षांचा पेन आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे कर्णधारबाबत चर्वितचर्वण सुरू आहे. स्मिथ म्हणाला संघहितासाठी काहीही करण्याची तयारी आहे. स्मिथने पुढे सांगितले की,‘संघाला पुढे घेऊन जाण्यास जे योग्य असेल ते मी करेल. माझ्या हातात जे काही आहे ते मी नक्की करेल.’
स्मिथने २०१९ मध्ये निलंबनाचा कालावधी पूर्ण केला , पण कर्णधारपद भूषवले नाही. तो म्हणाला,‘मी आता जेथे आहो तेथे खूश आहे. पण, यापूर्वी सांगितल्यामुळे संघहितासाठी काहीही करण्याची तयारी आहे.’ ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सकडे उपकर्णधारपद सोपविले तर मार्नस लाबुशेन व ट्रेविस हेड यांच्याकडे भविष्यातील कर्णधार म्हणून बघितले जात आहे. भारताने टी-२० मालिका जिंकली. दुखापतग्रस्त फिंचच्या स्थानी मॅथ्यू वेडला कर्णधार केले.
प्रशिक्षक लँगर म्हणाले,‘स्मिथला पुन्हा कर्णधार होण्यासाठी एका प्रक्रियेतून जावे लागेल.’ खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे ऑस्ट्रेलिया फलंदाजी क्रमामध्ये बदल करू शकतो. स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो तर लाबुशेन डावाची सुरुवात करू शकतो. स्मिथ म्हणाला,‘याची मला चिंता नाही. मी तिसऱ्या क्रमांकावर अनेकदा फलंदाजी केली आहे. तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावरच काय तर त्यापेक्षाही खाली खेळण्यास मला अडचण नाही. तिसऱ्या क्रमांकावर अनेकदा डावातील पहिले षटक खेळावे लागते.’ 

  भारताविरुद्ध १७ डिसेंबरपासून प्रारंभ होत असलेल्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाची खरी परीक्षा असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने व्यक्त केले आहे. वॉर्नर व विल पुकोवस्की दुखापतग्रस्त असल्यामुळे ऑस्ट्रेलियाला नव्याने संघाचा समतोल साधावा लागत आहे.
  व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत बोलताना स्मिथ म्हणाला, ‘आमच्या फलंदाजीच्या खोलीची परीक्षा निश्चित आहे. वॉर्नर संघात नाही आणि काही नवे खेळाड़ू येतील. त्यामुळे भारतासारख्या दिग्गज संघाविरुद्ध आपण कुठे आहोत, हे आम्हाला कळेल. यापूर्वीच्या मालिकेत त्यांनी आम्हाला पराभूत केले होते. त्यांचा संघ चांगला असून मालिका चुरशीची होईल. आमच्यातर्फे जो कुणी आघाडीच्या फळीत खेळेल, त्याला आपली जबाबदारी चोख बजवावी लागेल.’
  स्मिथने भारतीय गोलंदाजी आक्रमण शानदार असल्याचे म्हटले आहे, पण ईशांत शर्माविना हे सर्वोत्तम आक्रमण नाही. ईशांत दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे.
स्मिथ म्हणाला,‘भारताकडे चांगले अनुभवी गोलंदाज आहे. मोहम्मद शमीने बरेच क्रिकेट खेळले आहे आणि जसप्रीत बुमराहसुद्धा आहे. फिरकीपटूंमध्ये अश्विन, जडेजा व कुलदीप यांच्याकडे बराच अनुभव आहे. ईशांतचे न खेळणे भारतासाठी मोठे नुकसान आहे. त्याच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. त्याच्याविना हे सर्वोत्तम आक्रमण नाही.’

Web Title: Preparing to do what is right for the team: Smith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.