माजी कर्णधार सौरव गांगुलीनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रं अधिकृतरित्या हातात घेतली. 65 वर्षानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार प्रथमच बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर विराजमान होणार आहे. स्थानिक क्रिकेटपटूंचा मुद्दा हाती घेत, गांगुलीनं पहिल्याच बैठकीत आपला निर्धार व्यक्त केला. त्याचबरोबर त्यानं बीसीसीआयची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी योग्य पावलं उचलली जातील असेही सांगितले. भारतीय संघाला जगात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी कर्णधार विराट कोहलीच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारीही गांगुलीनं दाखवली आहे.
जयेश जॉर्ज - 50 वर्षीय जयेश यांच्याकडे क्रिकेट असोसिएशनच्या प्रशासकिय कामाचा अनुभव आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांनी 2005 पासून विविध पदांवर काम केले आहे.
माहिम वर्मा - उत्तराखंड क्रिकेट असोसिएशमध्ये 45 वर्षीय माहिम यांच्याकडे 10 वर्ष काम करण्याचा अनुभव आहे.