भारतीय संघाला वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत होऊन आजचा दुसरा दिवस उजाडला. स्पर्धेतील भारतीय संघाची कामगिरी पाहता हा वर्ल्ड कप आपलाच, असे सर्वांनाच वाटत होते. पण, ऑस्ट्रेलियासारखा चिवट संघ वर्ल्ड कप जिंकण्याची संधी अशी सहजासहजी सोडत नाही, हा इतिहास होता. त्यामुळे मनात धाकधुक होतीच आणि घडलेही तेच. ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने भारताला पराभूत केले आणि सहाव्यांदा वर्ल्ड कप उंचावला. या निकालानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये नैराश्य पसरले होते, संघातील काही खेळाडू ढसाढसा रडलेही.. या सर्वांचे सांत्वन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये पोहोचले. कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांचा हात हातात घेत त्यांनी खेळाडूंना धीर दिला.
हा प्रवास इथेच संपला असला तरी...! भारतीय संघाच्या पराभवानंतर जय शाह यांची लांबलचक पोस्ट
पीएम मोदींनी ड्रेसिंग रूममध्ये प्रत्येक खेळाडूशी चर्चा केली. यावेळी मोहम्मद शमी व रवींद जडेजा यांनी मोदींसोबतचा एक फोटो पोस्ट केला. मोहम्मद शमीने वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक २४ विकेट्स घेतल्या आहेत. मोदींनी रोहित व विराट यांना भेटून जय-पराजय होत असतो असे सांगितले. त्यानंतर मुख्य प्रशिरक्षक राहुल द्रविड यांचेही त्यांनी कौतुक केले. रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांच्यासोबत त्यांनी खास गुजरातीत गप्पा मारल्या. मोदी सर्व खेळाडूंना भेटले. यावेळी त्यांनी भारतीय संघाला दिल्लीत येण्याचे निमंत्रणही दिले. भारतीय संघातील एक सदस्य म्हणाला, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला सांगितले की, तुम्ही सर्वांनी १०० टक्के योगदान दिले आहे आणि त्यामुळे निराश होऊ नका. जय किंवा पराजय हे कोणाच्याही हातात नाही, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही चांगले खेळलात आणि कठोर परिश्रम केले."
मला त्यांच्याकडे पाहावत नव्हते! राहुल द्रविड नि:शब्दसामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल द्रविडला ड्रेसिंग रुममधील वातावरणाबद्दल विचारले असता तो म्हणाला, हे निराशाजनक आहे, ड्रेसिंग रुममध्ये प्रत्येक खेळाडू भावनिक झाला होता. एक प्रशिक्षक म्हणून मला त्यांच्या सामोरे जाण्याची हिंमत होत नव्हती. कारण, मला माहित्येय या पोरांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत घेतली आहे ती. त्यामुळे एक कोच म्हणून त्यांना असे पाहावत नव्हते, या सर्व पोरांना मी वैयक्तिक ओळखतो.