Prithvi Shaw : सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग या दोन महान फलंदाजाचं एक रुप म्हणून पृथ्वी शॉची ओळख करून दिली गेली होती.. त्याचा चेंडूवर प्रहार करण्याचा टायमिंग आणि आक्रमकता पाहून अनेकांना सचिन-वीरूची कॉपी वाटायची... देशांतर्गत क्रिकेट गाजवणारा हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटही गाजवले असे अनेकांना वाटले होते आणि त्याने सुरुवात तशी केलीही, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर यश टिकवणे तितके सोपं नाही हे त्याला लवकरच कळुन चुकले. त्यात दुखापतीने त्याला घेरले... त्यावरही मात करून तो देशांतर्गत क्रिकेट गाजवत राहिला, पण, भारतीय संघातील स्पर्धा आता एवढी वाढली आहे की त्याला पुन्हा स्थान मिळवण्यासाठी मोठा पराक्रमक करावा लागणार आहे.
पृथ्वीने ५ कसोटी सामन्यांत १ शतक व २ अर्धशतकांसह ३३९ धावा केल्या आहेत आणि ६ वन डे सामन्यांत त्याच्या नावावर १८९ धावा आहेत. दुखापतीमुळे तो बराच काळ मैदानाबाहेर होता आणि त्याने सावरल्यानंतर रणजी करंडक स्पर्धेत पुनरागमन केले. त्याने मुंबईकडून खेळताना आज छत्तीसगडविरुद्ध विक्रमी कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी व भुपेन लालवानी यांनी छत्तीसगडच्या गोलंदाजांची धुलाई केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी २४४ धावांची भागीदारी केली. पृथ्वी १८५ चेंडूंत १८ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १५९ धावांवर झेलबाद झाला. पण, त्याने मोठा विक्रम नावावर केला.
पृथ्वीने पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेक होण्यापूर्वीच म्हणजेच पहिल्या सत्रात शतक पूर्ण केले. यापूर्वी १९५० मध्ये दिल्लीच्या जेएन सेठ यांनी दक्षिण पंजाबविरुद्ध आणि सेनादलाच्या भरत अवस्थी यांनी १९६५ मध्ये जम्मू आणि कश्मीरविरुद्ध हा पराक्रम केला होता. पण, पृथ्वीने रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्या सत्रात शतक झळकावण्याचा पराक्रम दोनवेळा केला आहे आणि असा विक्रम नोंदवणारा तो पहिलाच फलंदाज आहे. आजच्या सामन्याआधी त्याने २०२३ मध्ये आसामविरुद्ध अशी वादळी खेळी केली होती.
Web Title: Prithvi Shaw 159 runs in 185 balls (18x4, 3x6) Mumbai 244/1; Prithvi Shaw becomes the FIRST Indian to score century in first session of a first-class match twice.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.