पृथ्वी शॉ आता झाला 'गली बॉय', बनवलं एक 'रॅप साँग'

पृथ्वीने रणवीर सिंहच्या  'गली बॉय' या सिनेमामधून प्रेरणा घेतल्याचे दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 05:30 PM2019-01-31T17:30:44+5:302019-01-31T17:32:06+5:30

whatsapp join usJoin us
Prithvi Shaw created a 'rap song' | पृथ्वी शॉ आता झाला 'गली बॉय', बनवलं एक 'रॅप साँग'

पृथ्वी शॉ आता झाला 'गली बॉय', बनवलं एक 'रॅप साँग'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : पदार्पणात शतक झळकावत पृथ्वी शॉ याने क्रिकेट जगतात आपला एक अमीट ठसा उमटवला होता. पण सध्याच्या घडीला तो दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. दुखापतीतून आता तो पूर्णपणे सावरला असला, तरी या पुनर्वसनाच्या काळात त्याने काही बॉलीवूडचे सिनेमे पाहिल्याचे निदर्शनास येत आहे. कारण पृथ्वी शॉ याने आता चक्क एक 'रॅप साँग' बनवले आहे.

सध्याच्या घडीला पृथ्वीने रणवीर सिंहच्या  'गली बॉय' या सिनेमामधून प्रेरणा घेतल्याचे दिसत आहे. कारण या सिनेमातील एका गाण्यानुसार पृथ्वीनेही एक गाणे तयार केले आहे. पृथ्वी शॉ ने आपल्या ट्विटरवर, 'अपना टाइम आएगा... इंजरी से फिट होके... मैं और रन बनाएगा... अपना टाइम आएगा...'असे गाणे लिहिले आहे. 


पृथ्वी याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून माघार घेतली होती. लोकेश राहुलच्या अपयशी कामगिरीमुळे पहिल्या कसोटीत पृथ्वी शॉचे स्थान निश्चित मानले जात होते. मात्र, सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली. सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पृथ्वी शॉने फलंदाजी करताना ६९ चेंडूत ६६ धावांची आक्रमक खेळी केली होती. त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी त्याचा सहभाग निश्चित होता. परंतु सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याला दुखापत झाली. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही दौऱ्यांना भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याला मुकावे लागले आहे. पण न्यूझीलंड दौऱ्यानंतर होणाऱ्या आयपीएलसाठी मात्र पृथ्वी फिट झाला आहे.

Web Title: Prithvi Shaw created a 'rap song'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.