मुंबई - भारताला 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकून दिल्यानंतर भारताच्या युवा संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ उगवत्या क्रिकेटपटूंसाठी यूथ आयकॉन बनलाय. सर्वच युवा क्रिकेटपटूंना त्याच्यासारखा यशस्वी क्रिकेटपटू बनून भारतीय संघासाठी खेळायचे आहे. अशा सर्व युवा क्रिकेटपटूंना पृथ्वी शॉ याने सक्सेस मंत्र दिला आहे. यशस्वी क्रिकेटपटू व्हायचं असेल तर तुम्ही मैदानावर खेळताना क्रिकेटचा आनंद घ्या, भरपूर मेहनत करा आणि फिटनेसवर लक्ष द्या म्हणजे तुम्हाला यश नक्कीच मिळेल, असं पृथ्वी म्हणाला. उगवता क्रिकेटपटू आणि भारताच्या 19 वर्षांखालील संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ याने लोकमतच्या मुंबई कार्यालयाला आज सदिच्छा भेट दिली. यावेळी पृथ्वीने सर्वांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. प्रश्नांचे तिरकस यॉर्कर सराईतपणे तटवले. तर बाउन्सरना चोख उत्तरं देत थेट सीमापार धाडले. आपल्या खेळामुळे उगवत्या क्रिकेटपटूंसाठी आदर्श ठरलेला पृथ्वी शॉ या खेळाडूंसाठी काय सल्ला देईल, असे विचारले असता तो म्हणाला, अनेक खेळाडूंना घरच्यांकडून चांगला पाठिंबा मिळत असतो. तर तुम्ही सर्वप्रथम क्रिकेट एन्जॉय करा. सगळेच जण काही भारतासाठी खेळू शकत नाहीत, पण तुम्ही खूप मेहनत करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वत:ला फिट ठेवा. सुरुवातीच्या काळात मलाही फिटनेसची समस्या जाणवली होती. त्यानंतर मी स्वत:च्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे जे आज अंडर 12, अंडर 14 च्या संघातून खेळत आहेत, त्या खेळाडूंनी चांगलं खाणं आणि फिटनेसवर लक्ष द्यायला पाहिजे. - पाहा पृथ्वीने लोकमतच्या टीमसोबत मारलेल्या दिलखुलास गप्पा -
- Cricket Buzz»
- बातम्या»
- यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी युवा खेळाडूंना पृथ्वीने दिला सक्सेस मंत्र
यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी युवा खेळाडूंना पृथ्वीने दिला सक्सेस मंत्र
भारताला 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकून दिल्यानंतर भारताच्या युवा संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ उगवत्या क्रिकेटपटूंसाठी यूथ आयकॉन बनलाय. सर्वच युवा क्रिकेटपटूंना त्याच्यासारखा यशस्वी क्रिकेटपटू बनून भारतीय संघासाठी खेळायचे आहे. अशा सर्व युवा क्रिकेटपटूंना पृथ्वी शॉ याने सक्सेस मंत्र दिला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 2:22 PM