डोपिंग नियमांच्या उल्लंघनानंतर पुन्हा क्रिकेटमध्ये सक्रीय झालेल्या पृथ्वी शॉ यानं रविवारी आणखी एक वादळी खेळी केली. आठ महिन्यांच्या बंदीनंतर मैदानावर परतलेल्या पृथ्वीनं सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत तीन सामन्यांतील दुसरे अर्धशतक झळकावलं. त्याच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबईनं सुपर लीग B गटाच्या सामन्यात झारखंडवर 5 विकेट्स आणि 5 चेंडू राखून विजय मिळवला. झारखंडचे 5 बाद 170 धावांचे आव्हान मुंबईनं यशस्वीरित्या पेललं.
प्रथम फलंदाजी करताना झारखंड संघानं 5 बाद 170 धावा केल्या. कुमार देवब्रतनं 30 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकारांच्या मदतीनं 58 धावा केल्या. कर्णधार सौरभ तिवारी ( 27) आणि सुमीत कुमार ( 33) यांनीही त्याला साजेशी साथ दिली. मुंबईकडून शुभम रांजणेनं 17 धावांत 2 विकेट्स घेतल्या. शार्दूल ठाकूर, धवल कुलकर्णी आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईसाठी
पृथ्वी शॉ आणि आदित्य तरे यांनी दमदार फटकेबाजी केली. दोघांनी 82 धावांची सलामी देताना मुंबईच्या विजयाचा भक्कम पाया घातला. 17 नोव्हेंबरला आसामविरुद्ध 63 धावा कुटणाऱ्या पृथ्वीनं आजही जोरदार फटकेबाजी केली. पृथ्वीनं आज झारखंडविरुद्ध 39 चेंडूंत 64 धावा केल्या आणि त्यात 4 चौकार व 5 षटकारांचा समावेश आहे.
Web Title: Prithvi Shaw half century; Mumbai won by 5 wickets against Jharkhand in Syed Mushtaq Ali Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.