Join us  

...म्हणून पृथ्वी शॉला मुंबईच्या संघातून काढलं; कारण वाचून तुम्हीही डोक्याला लावाल हात

Prithvi Shaw Out From Mumabi Ranji Team : पृथ्वी शॉ मुंबईच्या संघातून बाहेर झाला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 12:59 PM

Open in App

कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत ज्याची तुलना केली जायची तो पृथ्वी शॉ आताच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. विशेष बाब म्हणजे आता त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्येही स्थान मिळत नसल्याचे दिसते. पृथ्वी शॉने फार कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. मग त्याच्या कारकि‍र्दीला उतरती कळा लागली. माहितीनुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीने पृथ्वी शॉला रणजी करंडक स्पर्धेतील किमान एक सामन्यातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. संघातून डच्चू मिळताच त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवून बोलकी प्रतिक्रिया दिली. 

खरे तर पृथ्वी शॉचा पत्ता का कट केला गेला याचे ठोस कारण पुढे आले नाही. मात्र, मिडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईच्या प्रशिक्षकांमध्ये पृथ्वी शॉच्या फिटनेसवरुन नाराजी आहे. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार, शिस्तीचे पालन न केल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाने पृथ्वीला डच्चू देऊन धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. सराव सत्रात उशीरा पोहोचणे, यामुळे संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढली आहे. याशिवाय नेट सत्राचे गांभीर्य नसणे आणि वाढत्या वजनामुळे पृथ्वी शॉला संघातून वगळण्यावर निवड समिती विचार करत आहे. किमान दोन सामने तो बाकावर बसू शकतो. 

दरम्यान, कमी वयात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पृथ्वी शॉने त्याच्या कारकि‍र्दीत ५ कसोटी, ६ वन डे, आणि १ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. याशिवाय ५८ प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या शॉच्या नावावर १ शतक आणि २ अर्धशतकांसह ३३९ धावांची नोंद आहे. तसेच त्याने वन डेमध्ये १८९ धावा केल्या आहेत. 

टॅग्स :पृथ्वी शॉमुंबईरणजी करंडक