Prithvi Shaw, IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सची डोकेदुखी वाढली; ७.५० कोटींचा पृथ्वी शॉ फिटनेस टेस्टमध्ये नापास, IPL 2022 खेळणार की नाही?

IPL 2022: Prithvi Shaw fails FITNESS test - दिल्ली कॅपिटल्स आणि मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 08:09 PM2022-03-16T20:09:54+5:302022-03-16T20:11:34+5:30

whatsapp join usJoin us
Prithvi Shaw has failed in the Yo-Yo Test but he is allowed to play in IPL as he is not considered in any formats right now | Prithvi Shaw, IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सची डोकेदुखी वाढली; ७.५० कोटींचा पृथ्वी शॉ फिटनेस टेस्टमध्ये नापास, IPL 2022 खेळणार की नाही?

Prithvi Shaw, IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सची डोकेदुखी वाढली; ७.५० कोटींचा पृथ्वी शॉ फिटनेस टेस्टमध्ये नापास, IPL 2022 खेळणार की नाही?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022: Prithvi Shaw fails FITNESS test - दिल्ली कॅपिटल्स आणि मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ याला NCA मध्ये झालेली फिटनेस टेस्ट पास करता आली नाही. मुंबईचा पृथ्वी भारतीय संघाबाहेर आहे आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून त्याला पुनरागमन करायचे आहे. पण, आता तो दिल्ली कॅपिटल्सची फिटनेस टेस्टही नापास झाल्यास, त्याचे आयपीएलच्या सलामीच्या लढतीत खेळणे अवघड आहे.  

Yo-Yo Test पास होण्यासाठी १६.५ गुणांची कमाई करणे गरजेचे होते, परंतु पृथ्वीला १५ गुणच कमावता आले. त्यामुळेच त्याला घरच्या मैदानावरील भारतीय संघाच्या मालिकेत संधी मिळाली नाही. पृथ्वी शॉ हा बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंमध्ये नसल्याने तो आयपीएल २०२२ खेळू शकतो, परंतु त्याचा पुढील आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी संघात समावेश करण्याबद्दल विचार केला जाणार नाही.  पृथ्वीला आता दिल्ली कॅपिटल्सच्या फिटनेस चाचणीत यशस्वी व्हावे लागेल. डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेनंतर आयपीएल २०२२साठी दाखल  होणार आहे. त्यामुळे दिल्लीची डोकेदुखी आणखी वाढली आहे.  

बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, पृथ्वीने सलग तीन रणजी सामने खेळले आणि त्यामुळे आलेल्या थकव्याने तो Yo Yo Test पास करू शकला नाही.  


दरम्यान, रिषभ पंत व अष्टपैलू अक्षर पटेल हे आज दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात दाखल झाले.   
 

Web Title: Prithvi Shaw has failed in the Yo-Yo Test but he is allowed to play in IPL as he is not considered in any formats right now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.