Join us  

आता पृथ्वी शॉ भारताचा कसोटी संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणेबरोबर मैदानात उतरणार

येत्या काही दिवसांमध्ये पृथ्वी आणि अजिंक्य एकत्र पाहायला मिळणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 10:20 PM

Open in App

मुंबई : उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळलेल्या पृथ्वी शॉ आता भारताचा कसोटी संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणेबरोबर मैदानात एकत्र उतरणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये पृथ्वी आणि अजिंक्य एकत्र पाहायला मिळणार आहेत.

काही दिवसांपूर्वी पृथ्वी एक स्थानिक सामना खेळत असताना त्याची उत्तेजक द्रव्य चाचणी घेण्यात आली होती. यावेळी या चाचणीमध्ये तो दोषी आढळला होता. त्यामुळे त्याच्यावर सहा महिन्यांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पृथ्वी शॉचे संघात पुनरागमन; अखेरच्या सामन्यांत खेळणार" src="https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/prithvishreturn_201911324969.jpg"/>

 

भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर काही दिवसांपूर्वी उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी बंदी घालण्यात आली. पण ही बंदी उठल्यावर पृथ्वी आज मैदानात उतरला आणि त्याने तुफानी खेळी साकारत दमदार पुनरागमन केले होते.

बीसीसीआयच्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत पृथ्वीने धडाकेबाज फलंदाजी करत आपले पुनरागमन साजरे केले होते. मुंबईचा आज आसामविरुद्ध सामना होता. या सामन्यात पृथ्वीने ३९ चेंडूंमध्ये ६३ धावांची जबरदस्त खेळी साकारली. या खेळीमध्ये त्याने सात चौकार आणि दोन षटकारांची बरसात केली. पृथ्वीच्या दमदा फलंदाजीच्या जोरावर मुंबईला २०५ धावांचा डोंगर उभारता आला. मुंबईच्या या आव्हानाचा पाठलाग करताना आसामला १२३ धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईने हा सामना ८३ धावांनी जिंकला होता.

मुंबईचा रणजी संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवला देण्यात आले आहे, तर उप कर्णधारपद आदित्य तरेकडे सोपवण्यात आले आहे. या संघात पृथ्वीला स्थान देण्यात आले आहे. या संघात अजिंक्यलाही स्थान दिले आहे, त्यामुळे हे दोघे आता एकत्र खेळताना आपल्याला दिसणार आहेत.

टॅग्स :पृथ्वी शॉअजिंक्य रहाणेरणजी करंडक