भारतीय संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉने चुकून बंदी असलेले द्रव्य प्यायले आणि वाडाच्या नियमानुसार तो उत्तेजक द्रव्य सेवनात दोषी आढळला आहे. बीसीसीआयने त्याच्यावर 9 महिन्यांची बंदी घातल्यात आली होती आणि ती बंदी 16 नोव्हेंबर 2019ला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे पृथ्वी शॉचे संघात पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे आणि सध्या सुरू असलेल्या स्पर्धेतील अखेरच्या सामन्यांत तो खेळणार आहे.
पृथ्वी शॉनं डोपिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयनं त्याच्यावर कारवाई केली. सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेदरम्यान पृथ्वीच्या लघवीचा नमुना घेण्यात आला. 22 फेब्रुवारी 2019 रोजी इंदूरमध्ये ही चाचणी घेण्यात आली. यातून पृथ्वीच्या शरीरात टर्ब्युटलाइन असल्याचं निष्पन्न झालं. टर्ब्युटलाइनचा समावेश वाडानं प्रतिबंधित द्रव्यांमध्ये केला आहे. यानंतर बीसीसीआयनं उत्तेजक द्रव्यविरोधी नियमांतर्गत पृथ्वीवर कारवाई केली.
या कारवाई नंतर पृथ्वी म्हणाला होता की," सय्यद मुश्ताक स्पर्धेदरम्यान मला सर्दी खोकल्याचा त्रास झाला होता. त्यावेळी मी औषध घेतले त्यात बंदी घातलेल्या द्रव्य निष्पन्न झाले. बीसीसीआयच्या नियमाचे मी अप्रत्यक्षिकपणे उल्लंघन केले. मला माझी चूक मान्य आहे. खेळाडूने किती सतर्क राहायला हवं याचा धडा मला शिकायला मिळाला."
पण, आता पृथ्वीच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे आणि त्याचा मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 चषक स्पर्धेतील अखेरच्या दोन साखळी गटाच्या सामन्यात तो मुंबईचे प्रतिनिधित्व करणार आहे. गुरुवारी या दोन सामन्यांसाठीचा संघ जाहीर करण्यात आला आणि त्यानुसार पृथ्वी आसामविरुद्धच्या सामन्यात मैदानावर परतेल.
मुंबईचा संघ - सूर्यकुमार यादव ( कर्णधार) , श्रेयस अय्यर, पृथ्व शॉ, आदित्य तरे, सिद्धेश लाड, शिवम दुबे, जय बिस्त, शुभम रांजणे, सुजीत नायक, शाम्स मुलानी, ध्रुमील मटकर, शार्दूल ठाकूर, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, एकनाथ केरकर.