Prithvi Shaw: पृथ्वी शॉ'वर हल्ला करणाऱ्या महिला चाहत्याला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

Prithvi Shaw News : भारतीय संघाचा खेळाडू पृथ्वी शॉवर मुंबईत हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती. या संदर्भात एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 08:38 PM2023-02-16T20:38:17+5:302023-02-16T20:40:26+5:30

whatsapp join usJoin us
Prithvi Shaw news sapna gill arrested in case of prithvi shaw car attack and assaulted video photos | Prithvi Shaw: पृथ्वी शॉ'वर हल्ला करणाऱ्या महिला चाहत्याला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

Prithvi Shaw: पृथ्वी शॉ'वर हल्ला करणाऱ्या महिला चाहत्याला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : Prithvi Shaw News : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू पृथ्वी शॉवरमुंबईत हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती. या संदर्भात एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आहे. पृथ्वी शॉवर हल्ला करणारी ब्लॉगर आणि यूट्यूबर सपना गिल हिला पोलिसांनी अटक केली आहे. ओशिवरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटकेनंतर सपना गिलचे मेडिकलही करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सपना गिलला आता शुक्रवारी (17 फेब्रुवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. सध्या आरोपीच्या वतीने कोणताही क्रॉस एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.

याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आधी कारची तोडफोड केल्याची तक्रार 7 जणांविरुद्ध आहे. त्यानंतर प्रकरण मिटवण्याच्या नावाखाली 50  हजार रुपयांची मागणीही केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नुकतीच अटक करण्यात आली आहे. 

Prithvi Shaw: पृथ्वी शॉसोबत 'सेल्फी'वरून वाद; महिला चाहत्याचा कारवर हल्ला, 8 जणांविरुद्ध FIR दाखल

सेल्फीवरुन वाद 

भारतीय संघाचा खेळाडू पृथ्वी शॉ याने सेल्फी घेण्यास नकार दिल्याने काही चाहते संतप्त झाले आणि त्यांनी क्रिकेटरच्या कारवर हल्ला केला. ही घटना बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान पृथ्वी शॉ त्याच्या मित्रासोबत कारमध्ये बसला होता. त्यानंतर काही लोक तेथे आले आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यास सांगितले. पृथ्वीने नकार दिल्यानंतर त्याच्या कारवर बेसबॉलच्या बॅटने हल्ला करण्यात आला. चाहत्यांनी क्रिकेटपटूच्या कारची तोडफोड केली आणि 50 हजार रुपयांची मागणीही केल्याचे सांगण्यात येत आहे. 

Web Title: Prithvi Shaw news sapna gill arrested in case of prithvi shaw car attack and assaulted video photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.