prithvi shaw 379 : युवा खेळाडू पृथ्वी शॉला रणजी करंडक २०२४-२५ हंगामाच्या तिसऱ्या फेरीपूर्वी मुंबई संघातून वगळण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे पृथ्वी शॉ तंदुरुस्त नसल्याने त्याला वगळण्यात आल्याचे कळते. शरीरात ३५% पेक्षा जास्त चरबी असल्यामुळे पृथ्वी शॉला मुंबई संघातून वगळण्यात आले आहे. तो मागील मोठ्या कालावधीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासूनही दूर आहे. अशातच भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी याबाबत आपली बाजू मांडली.
नियमांचे पालन करुन त्याला वगळण्यात आले असेल तर आपण समजू शकतो, असे गावस्करांनी म्हटले. तसेच पृथ्वी शॉला संघातून काढून टाकण्याचे कारण त्याचे वजन आणि त्याची वाढलेली तब्येत हे आहे. नियमावलीनुसार त्याला बाहेर केले असेल तर मला काही हरकत नाही पण त्याचा त्याच्या वजनाशी काही संबंध नाही. पृथ्वी शॉच्या शरीरातील चरबी जास्त असल्याचा अहवाल देखील समोर येत आहे, असेही गावस्करांनी नमूद केले.
देशांतर्गत सामन्यांबद्दल भाष्य करायचे झाले तर, रणजी करंडक विजेत्या मुंबईने पृथ्वी शॉला संघातून वगळले आहे. त्याच्याबाबत वेगवेगळे वृत्त समोर येत आहे. भारतीय फलंदाज सर्फराज खानचे उदाहरण देताना सुनील गावसकर म्हणाले की, सर्फराज खानने बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार फलंदाजी करत १५० धावा केल्या. त्याचेदेखील वजन खूप आहे पण तरीही या युवा फलंदाजाने दिवसभर फलंदाजी करत १५० धावांचा आकडा गाठला. असेच काहीसे पृथ्वी शॉच्या बाबतीत आहे. त्याने ३७९ धावा करण्याची किमया साधली आहे. त्यामुळे शून्य टक्के किंवा शरीरात किमान चरबी असलेले किती खेळाडू आहेत? ज्यांनी त्रिशतकी खेळी केली आहे, असा प्रश्न मला पडतो. गावस्करांनी एका वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या लेखाद्वारे पृथ्वी शॉची पाठराखण केली. बहुतांश खेळाडूंचे वजन खूप असले तरी त्यांच्यामध्ये प्रभावी कामगिरी करण्याची क्षमता असत असे त्यांनी स्पष्ट केले.
Web Title: Prithvi Shaw out of Mumbai team due to obesity sunil Gavaskar supported Sarfraz khan as an example
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.