BCCI ने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. १६ सदस्यीय संघाचे नेतृत्व अपेक्षेप्रमाणे शिखर धवनकडे ( Shikhar Dhawan) सोपवण्यात आले आहे, तर श्रेयस अय्यर उप कर्णधार असणार आहे. या संघात पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याच्याकडे पुन्हा एकदा BCCI ने दुलर्क्ष केल्याचे दिसले. स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीकरूनही पृथ्वीला भारतीय संघात स्थान न मिळत असल्याचे चाहते प्रचंड नाराज दिसले. त्याचवेळी पृथ्वीनेही आपली नाराजी प्रकट करणारी पोस्ट लिहिली.
आता सूर्याला न खेळवण्याचाच विचार करतोय! Rohit Sharmaच्या विधानानं सारेच अवाक् Video
रवी बिश्नोई, मुकेश कुमार व रजत पाटीदार यांना वन डे संघात पदार्पणाची संधी मिळणार आहे. उम्रान मलिकचे नाव या यादीत नसल्याने तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप साठी राखीव खेळाडू म्हणून जाईल हे निश्चित झालं आहे. शुबमन गिलने नुकतेच कौंटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना शतक झळकावले होते आणि त्याचाही या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. इशान किशन व संजू हे दोन यष्टिरक्षक संघात आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी राखीव गटात असलेल्या श्रेयस अय्यर व दीपक चहर यांना या मालिकेत निवडले आहे. मुकेश कुमार यालाही पदार्पणाची संधी दिली आहे.
पृथ्वीने न्यूझीलंड अ विरुद्धच्या वन डे मालिकेत दोन सामन्यांत ९४ धावा केल्या होत्या आणि त्याला आफ्रिकेविरुद्ध संधी मिळण्याची आशा होती. पण, तसे झाले नाही आणि पृथ्वीने इंस्टा स्टोरीतून आपले दुःख व्यक्त केले. ''त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नका, त्यांच्या कृतीकडे पाहा. कारण त्यांची कृती हेच सिद्ध करते की शब्दाला किंमत नाही,''असे पृथ्वीने त्याच्या स्टोरीत लिहीले आहे.
भारतीय संघ - शिखर धवन ( कर्णधार), श्रेयस अय्यर ( उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रजत पाटिदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चहर
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"