नवी दिल्ली : एकीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताच्या वरिष्ठ खेळाडूंचा संघ टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला गेला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघ टी-२० विश्वचषक २०२२ च्या तयारीत व्यस्त आहे. तर दुसरीकडे शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय युवा स्टार्स दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहेत. या संघात शुबमन गिल, रजत पाटीदार, ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी अशा खेळाडूंना संधी दिली मिळाली आहे. मात्र आणखी एक युवा खेळाडू पृथ्वी शॉला स्थान मिळाले नाही, यावरून खुद्द पृथ्वीने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईचा खेळाडू असलेला पृथ्वी शॉला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले आहे. आपल्याकडे दुर्लक्षित झाल्यानंतर त्याने अखेर मौन सोडले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की, मी निराश झालो आहे. मी धावा करत आहे, खूप प्रयत्न करत आहे, पण मला संधी मिळत नाही. मात्र, जेव्हा केव्हा, कुठे आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो परफॉर्म करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पृथ्वी शॉने व्यक्त केली नाराजी
मिड-डेशी बोलताना शॉने म्हटले, "मी निराश झालो आहे. मी धावा करत आहे, खूप प्रयत्न करत आहे, पण मला संधी मिळत नाही. पण ते ठीक आहे. पण जेव्हा निवडकर्त्यांना वाटेल की मी तयार आहे, तेव्हा मला खेळवतील. मला जी काही संधी मिळेल, मग ती भारत 'अ' संघासाठी असो किंवा इतर संघांसाठी असो, मी माझा सर्वोत्तम प्रयत्न करेन आणि माझी फिटनेस पातळी कायम राखेन."
खरं तर पृथ्वीने यावेळी हे देखील सांगितले की, आयपीएल २०२२ नंतर त्याने ७ ते ८ किलो वजन कमी केले आहे. यादरम्यान त्याने आपल्या आहाराकडेही खूप लक्ष दिले आहे. "मी माझ्या फलंदाजीत वेगवेगळ्या गोष्टींवर काम केले नाही, पण फिटनेसवर खूप काम केले. मी मागील आयपीएलच्या हंगामानंतर वजन कमी करण्यावर काम केले आणि सात ते आठ किलो वजन कमी केले. मी जिममध्ये बराच वेळ घालवला आहे, खूप धावलो, मिठाई आणि कोल्ड्रिंक खाण्यावर नियंत्रण ठेवले. तर चायनीज फूड आता माझ्या मेनूमधून पूर्णपणे बाहेर आहे", असे पृथ्वी शॉने अधिक सांगितले.
Web Title: Prithvi Shaw said, I am scoring runs, trying hard but not getting opportunities
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.