४ सामन्यांत ४२९ धावा करणाऱ्या पृथ्वी शॉ याच्यावर नशीब रुसलं; अचानक घ्यावी लागली माघार

भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) कसून मेहनत घेतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 01:19 PM2023-08-17T13:19:37+5:302023-08-17T13:19:59+5:30

whatsapp join usJoin us
Prithvi Shaw scored 429 runs in four innings for Northamptonshire, but he will take no further part in the ongoing One-Day Cup competition due to injury | ४ सामन्यांत ४२९ धावा करणाऱ्या पृथ्वी शॉ याच्यावर नशीब रुसलं; अचानक घ्यावी लागली माघार

४ सामन्यांत ४२९ धावा करणाऱ्या पृथ्वी शॉ याच्यावर नशीब रुसलं; अचानक घ्यावी लागली माघार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) कसून मेहनत घेतोय. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वन डे कप स्पर्धेत त्याने एक द्विशतक अन् शतकासह ४ सामन्यांत ४२९ धावा चोपल्या. पण, नॉर्थहॅम्पटनशायर क्लबकडून खेळणाऱ्या पृथ्वीला दुर्दैवाने स्पर्धेतून अचानक माघार घ्यावी लागली आहे. रविवारी डरहॅम संघाविरुद्ध सराव करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्याच्या दुखापतीचं स्कॅन केलं गेलं अन् ही दुखापत गंभीर असल्याचे समोर आले. नॉर्थहॅम्पटनशायरने याबाबत निवेदन प्रसिद्ध केलं अन् आता पृथ्वीच्या दुखापतीवर बीसीसीआयची वैद्यकीय टीम उपचार करणार आहे.

जय शाह यांची राहुल द्रविडशी २ तास चर्चा, वर्ल्ड कपबाबत दिलेल्या वचनाची करून दिली आठवण


पृथ्वीने लंडनमध्ये सुरू असलेल्या वन डे कप स्पर्धेत ४ इनिंग्जमध्ये दोन शतकं झकावली आहेत. त्याने सोमरसेटविरुद्ध १५३ चेंडूंत २४४ धावांची खेळी केली आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये इंग्लंडमधील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. त्याने १२५*, २६ आणि ३४ धावांची खेळी करून चार इनिंग्जमध्ये ४२९ धावा कुटल्या. ''पृथ्वीने अल्पावधीतच क्लबसाठी खूप मोठं योगदान दिलं, परंतु उर्वरित स्पर्धेत आता तो संघासोबत नसणार आहे. हा आमच्यासाठी धक्का आहे,''असे नॉर्थहॅम्पटनशायरचे प्रशिक्षक जॉन सॅडलर यांनी म्हटले. 


ते पुढे म्हणाले,''तो अत्यंत नम्र खेळाडू आहे, तो सर्वांचा आदर करतो आणि नॉर्थम्प्टनशायरचे प्रतिनिधित्व करण्याच्या संधीबद्दल तो खूप कृतज्ञ आहे. तसेच मैदानावरील त्याच्या कामगिरीचा आमच्या ड्रेसिंग रुमवर मोठा प्रभाव पडला. तो संघाला विजय मिळवून देण्यासाठी अधिक भुकेला होता. आम्ही त्याला शुभेच्छा देतो आणि त्याला लवकरच पुन्हा धावा करताना पाहण्याची आशा आहे."


चांगल्या फॉर्मात परतला असताना पृथ्वीला दुखापत झाल्याने चाहते नाराज नक्की झाले असतील. आयपीएल २०२३ मध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरला. जुलै २०२१ मध्ये तो भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता.  यावर्षी फेब्रुवारीत तो ट्वेंटी-२० संघात परतला होता, पण आयपीएल २०२३ मधील निराशाजनक कामगिरीमुळे त्याचा पुन्हा ट्वेंटी-२० संघासाठी विचार केला गेला नाही.  

Web Title: Prithvi Shaw scored 429 runs in four innings for Northamptonshire, but he will take no further part in the ongoing One-Day Cup competition due to injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.